गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये वातावरणात जरासा जरी बदल झाला की बऱ्याच जणांना व्हायरल इंफेक्शनचा त्रास सूरू व्हायला लागतो. 
त्यात सर्दी खोकला, घसा दुखणं असे त्रास अगदी सहजच होतात. अनेकांना या सगळ्या गोष्टींचा सारखा सारखा त्रास देखील होतो.


मात्र यावर डॉक्टरचे उपाय केले तरी पुन्हा जरा काही हवामानात बदल झाला तर त्रास पुन्हा डोके वर काढतो. यावर घरचे उपाय कधीकधी खूप चांगल्या प्रकारे मदतशीर ठरू शकतात.पूर्वीच्या काळात सर्रास औषधं उपलब्ध व्हायची नाहीत अशावेळेस जवळ जवळ सगळेच लोकं घरगुती उपायांनी बरे व्हायचे. असे अनेक घरगुती उपाय आपल्या आजच्या पिढीला कदाचित माहित देखील नाहीत. वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे घशात होणारी खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या अत्यंत फायदेशीर ठरतात. मीठाच्या पाण्यामुळे नाक, घसा मोकळा होण्यास खूपच मदत होते.


# कोमट पाण्यात प्रमाणात मीठ टाकून गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होऊन तोंडातील इंफेक्शानचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. मीठाच्या कोमट पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील अ‍ॅसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

# मीठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यानं घशामध्ये वारंवार होणाऱ्या सर्दीमुळे साचलेला कफ, तसेच त्यामुळे होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी मदत होते.

# श्वासनलिकेला होणारा त्रास, सूज कमी करण्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने मदत होते. जर आपल्याला जास्त प्रमाणात सर्दी झाली असेल तर मीठाच्या पाण्याने गुळण्या करा ज्याच्यामुळे तुमचे नाक मोकळं होण्यास मदत होईल. 

# बऱ्याच वेळेला कफ आपल्या घशातून बाहेर न पडता तशाच परिस्थिती राहतो आणि काही दिवसांनी हाच कफ खराब होतो त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येण्याची शक्यता जास्त असते अशा वेळेस तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरू शकतात.

# सर्दीचे औषधं पिऊन आलेला तोंडातील कडवटपणा कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या केल्याने तोंडातील वास निघून जायला मदत होते.

# जर आपला आवाज बसला असेल तर कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यानं आवाज खुलण्यास मदत होते. 

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...