बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

या '५' फायद्यांंसाठी आहारात नक्की करा मूगडाळीचा समावेश

या '५' फायद्यांंसाठी आहारात नक्की करा मूग डाळीचा समावेश


तसे पाहायला गेले तर डाळींमधले सगळेच प्रकार हे आपल्या शरीरासाठी पोषक असतात त्यामधीलच एक म्हणजे मूग डाळ.
Image result for मूग डाळ
vegecravings.com

मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, वरण आणि भात खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला फायदेशीर ठरते.

मूग डाळीमुळे रोजच्या धावपळीने थकून गेलेला चेहरा उजळण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. चेहर्‍यावरील डाग मिटवण्यापासून  ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ  चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरते. 
मूग डाळीचे फायदे 
अकाली सुरकुत्या
मूगडाळीमध्ये व्हिटॅमिन आणि फॉस्फरस घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सततच्या ताणामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अकाली तयार झालेल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच नैसर्गिकरित्या जर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील डाग कमी करायचे असतील तर मूग डाळ फायदेशीर ठरते
केसांच्या आरोग्यासाठी
मूगडाळीमध्ये कॉपर मुबलक प्रमाणात असल्यामुळे वातावरणातील प्रदूषणाने तसेच अधिक ताणाने खराब झालेल्या केसांना मजबूती येण्यास मदत होते त्यामुळे केसांना समूळ मजबुतपणा येतो. मूगडाळीमुळे मेंदूमधील ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.
पोटाचा त्रास
मूग हे पचायला हलके असल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच मूग डाळीमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या फायबर घटकामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण आपोआपच नियंत्रणात राहते.

लठ्ठपणा
मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास खूपच चांगल्या प्रकारे मदत करते. यामुळे जे लोक वजन घटवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनीं दोन जेवणांच्या मधल्या वेळेत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उकडलेले मूग खाणं फायदेशीर आहे. तसेच मूग खाल्ल्याने रक्तदाबही चांगल्या प्रकारे आटोक्यात रहाण्यास मदत होते.



आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...