मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

मोसंबीचे ७ मोठे फायदे

मोसंबीचे ७ मोठे फायदे

मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते.
यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. 

मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणारे फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कॅलरी आणि फॅट खुप कमी असते.

१. मोसंबीमुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते. मोसंबीमुळे शरिरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरिरातील शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा ज्यूस फायदेशीर आहे.
२. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
३. मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. मोसंबीचं नियमित सेवन केल्यास त्वचा उजळते.
४. पोटासंबंधीत समस्यांवर मोसंबी गुणकारी ठरते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फाइबर असतात.
५. मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे.
६. डोळ्यांसाठीही मोसंबीचा रस फायदेशीर मानला जातो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब टाकून डोळे धुतल्यास कोणत्याही इन्फेक्शनपासून तुम्हाला आराम मिळेल.
७. वजन कमी करण्यासाठी मोसंबी अधिक फायदेशीर ठरते. नियमित कोमट पाण्यात मोसंबीचा रस आणि मध एकत्र करुन प्यायल्याने लाभ होतात.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...