शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

प्रत्येक माणसाला भूक लागणं ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. रोजच्या रोज खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य म्हणूनच सुरळीतपणे चालतं. 
freeimages.com
मात्र जर भूकेचे गणित बिघडले असेल तर मात्र हे आपल्या शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण असू शकते.
डिहायड्रेशन किंवा गरोदरपणात सतत भूक लागणे एकवेळ समजू शकते. मात्र तुम्हांला ह्या व्यतिरिक्त कायमच सतत भूक लागत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणं फारच गरजेचे आहे. 
सतत भूक लागण्याची कारणं आणि आजार 
१. मधुमेह - 
भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. मधुमेह हा आजार हल्ली सगळ्याच वयोगटामध्ये झपाट्याने वाढत चाललेला दिसून येत आहे. हल्लीच्या बदलत्या लाईफस्टाईमुळे हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बळावण्याचा धोका वाढलेला असून सतत भूक लागणं हे मधुमेहातील काही लक्षणांपैकी एक लक्षण असून त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये आणि ताबडतोब स्वतःची वैद्यकीय चाचणी करून घ्यावी. 
२. अनियमितपणे जेवणे -
अनियमितपणे जेवणे ह्यालाच वैद्यकीय भाषेत इटिंग डिसऑर्डर असे म्हटले जाते ज्यात, ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे अशी व्यक्ती संपूर्ण दिवसभरात अनियमितपणे खाते. कधी कधी तर खायचा अंदाज न आल्याने व अति खाल्ल्याने अनेकदा अशा लोकांना उलटीचा त्रास देखील होतो. अशी व्यक्ती खाण्याच्या बाबतीत खूपच गोंधळलेली असते, त्या व्यक्तीला कधी काय खावं हे कळतच नाही.
helpguide.org
३.पोटात जंत होणे -
जर तुमच्या पोटात जंत झाले असतील तर तुम्हांला सतत भूक लागू शकते. कारण जंत हे परजीवी असून ते आपल्याच पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं सातत्याने शोषून घेतात. यामधूनच शरीरामध्ये फॅट वाढणं, रक्तातील साखरेची पातळी वाढणं अशा समस्या कालांतराने बळावू लागतात.
herzindagi.com
४. औषधं - 
जर तुम्ही सतत काही औषधे घेत असाल तर अशा औषधांमुळेही सतत भूक लागू शकते. म्हणूनच आपल्या रोजच्या औषधांबरोबर जर काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय आपण केलेत तर आपल्या औषधांची मात्रा निश्चितच कमी होऊ शकते.
५. ताण तणाव -
ताणतणावामध्ये असणार्‍या व्यक्ती बहुतेकवेळा अनियमितपणे जेवण घेतात. यामुळे त्यांच्यामध्ये सतत खाण्याची इच्छा बळावून त्याचा थेट परिणाम मेंदूवर ताण येण्यावर होतो. अशामुळे भूकेचं प्रमाण वाढू शकते. म्हणूनच स्वतःला शक्यतो ताण तणावापासून दूर ठेवा, त्यासाठी व्यायाम, ध्यान किंवा एखादा आवडता छंद जोपासा, जेणेकरून तुम्हाला तणावापासून दूर राहता येईल.
freeimages.com

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...