गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

या १० रोगांपासून बचाव करतात ही ५ फळं, रक्ताचीही कमतरता दूर होते

या १० रोगांपासून बचाव करतात ही ५ फळं, रक्ताचीही कमतरता दूर होते

आपल्याला डॉक्टर नेहमीच फळे खायला सांगतात. आपल्या रोजच्या आहारात जर वेगवेगळ्या फळाचा समावेश असेल तर आपले आरोग्यसुद्धा चांगले राहील. 
floweradvisor.com.sg
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या फळांचे फायदे ऐकून किंवा वाचून माहित झालेले असतील. असेही बरेच लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या फळांचा अनुभव ती खाऊन घेतला आहे. 

त्यामुळे फळांविषयी सगळ्यांचेच एक चांगले मत आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्ही पूर्वीही ऐकले असेल पण त्याचे असेही फायदे आहेत हे कदाचित प्रथमच आपल्याला ह्या लेखातून माहित पडेल. तर मग पाहूया कोणती फळे आहेत ही.
१) हिरव्या सफरचंदामध्ये लाल सफरचंदाच्या तुलनेत अधिक प्रमाणात नैसर्गिक साखरेचे आणि फायबरचे प्रमाण असते. ज्या व्यक्तींना मधुमेह आटोक्यात आणायचा आहे, फुफ्फुसाच्या कॅन्सरची शक्यता कमी करायची आहे, वाढत्या वयाचा शरीरावरील प्रभाव रोखून ठेवायचा आहे, रक्त शुद्ध करायचे आहे, हाडांना मजबूत आणि मेटाबोलिज्म वाढवायचा आहे त्यांनी हिरव्या सफरचंदाचे सेवन करावे.
lokmat.com
२) सीताफळ ह्या फळाचे असे काही वैशिष्ट्य आहे की ज्यात कोणत्याही कारंणाने आपल्या शरीराचे कमी झालेले वजन वाढवण्याची क्षमता भरपूर असते. यात अॅंटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात आढळून येतात. व्हिटॅमिन सी मध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. या फळाच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला एनर्जीही मिळते. हे फळ खाल्याने थकवा आणि मांसपेशींच्या समस्येपासून सहज सुटका मिळण्यास मदत होते.
freeimages.com
३) आपल्यामध्ये असे बरेच लोक असतील ज्यांना द्राक्ष खायला खूप आवडतात. महत्त्वाची बाब म्हणजे द्राक्षामुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. या फळामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी, ई तसेच ग्लूकोज, मॅग्नेशिअम आणि सायट्रिक अॅसिडसारखे पोषक तत्वही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे फळ मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास आहे अशा लोकांनी द्राक्षाचा रस घेतल्यास त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो.
freepik.com
) पेर या फळामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या खनिज, व्हिटॅमिनमुळे हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात फायबर आणि खनिज अधिक प्रमाणात आढळतं जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. तसेच यातील काही घटकांच्या मदतीने रक्तामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही चांगल्या प्रकारे मदत होते.
lokmat.com
५) एका शोधानुसार, असे समोर आले आहे की पेरूची पाने रक्तातील शुगर कमी करण्यास मदत करतात. पेरूच्या पानांचे चूर्ण शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी पेरूच्या पानांचं चूर्ण खावं.
freeimages.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...