डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कशी दूर कराल

डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कशी दूर कराल 

बदललेली जीवनशैली आणि वाढलेला कामाचा ताण यामुळे बऱ्याचदा रात्री उशीरापर्यंत काम करणे भाग पडते. 
तसेच अभ्यासाचे प्रेशर असल्यामुळे अनेक विद्यार्थीही बराचवेळ पुस्तकांमध्ये डोकं घालून बसतात.

यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हल्ली डोळ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. स्मार्टफोन, संगणक तसेच इतर विविध कारणांनी सातत्याने आपल्या डोळ्यांवर ताण पडत असतो. कित्येकदा आपण डोळ्यांना त्रास होतील अशा गोष्टी वारंवार करत असतो.

यामुळे कालांतराने  डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. डोळे लाल होणं, जळजळ होणं, डोळ्यांतून सतत पाणी येणं, धुरकट दिसणं यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच काही सोप्या उपयांमुळे डोळ्यांच्या या समस्या तुम्ही सहज दूर करू शकता.

१) जर तुम्ही सतत कॉम्पुटरसमोर काम करत असाल तर डोळ्यांची थोड्या थोड्या वेळाने उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा न येता डोळे जळजळण्याची समस्या कमी होईल.

२) दिवसातून कमीत-कमी 4 ते 5 वेळा डोळे थंड पाण्याने धुतल्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल. तसेच कुठून बाहेरून आपण ऑफिसमध्ये किंवा घरी आल्यावर डोळे थंड पाण्याने धुवायची स्वतःला आवर्जून सवय लावा.

३) काकडीचे तुकडे काही काळ डोळ्यांवर ठेवल्यानेही त्यांचा थकवा दूर होतो. काकडीमध्ये असलेल्या थंडाव्यामुळे डोळ्यांजवळील थकलेल्या पेशी शांत होतात.

४) कामाच्या वेळी दिवसातून दोन-वेळा डोळ्यांचा व्यायाम करा. डोळ्यांचा व्यायाम केल्याने ब्लड सर्क्युलेशन नीट होते. त्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवत नाही आणि कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. पाच मिनिटे डोळ्यांची बुब्बुळे उजव्या आणि डाव्या बाजूला फिरवा असे दर काही वेळाने करा.

५) संगणकावर किंवा कोणतेही काम करताना दर साधारण एक तासाने विश्रांती घ्या. 5 मिनिटे डोळे बंद ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल.

६) वारंवार डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, खाज सुटणे या समस्या असतील तर डॉक्टरांना भेटा.

 Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या