दातांना येणाऱ्या झिणझिण्या या उपायांनी थांबवा

दातांना येणाऱ्या झिणझिण्या या उपायांनी थांबवा

आजकाल टेलिव्हिजनवर एक जाहिरात खूपच प्रसिद्ध होत आहे आणि तिचा विषय आहे आपल्या दातांची सेंसिटीव्हीटी म्हणजेच दातांमध्ये झिणझिण्या येणे आणि ही समस्या अनेकांना सतत होत असते. 
lokmat.com
याचा काही लोकांना कधी कधी इतका त्रास होतो की, काही खाणं तर सोडाच पण पाणी पिणेही कठिण होऊन जाते. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला येथे काही खास टिप्स सांगणार आहोत. 

१) दातांची स्वच्छता निट करा
दातांची स्वच्छता करण्यासाठी कायम मुलायम ब्रशचा वापर करा. मुलायम ब्रशमुळे दातांना आणि हिरड्यांना कमी त्रास जाणवतो तसेच नेहमी माऊथवॉशचा वापर करा. दिवसातून दोनदा ब्रश तर केलाच पाहिजे. काहीही खाल्यानंतर चांगल्याप्रकारे गुळण्या करा जेणेकरून दातांमध्ये कोणतेही खाद्यपदार्थ अडकून राहणार नाहीत. 
freeimages.com
२) डाएटची कायम काळजी घ्या 
जर तुम्हाला दात आणि हिरड्या दुखण्याची समस्या आहे तर ज्यात सिट्रिक अॅसिडचं प्रमाण अधिक असतं असे पेय घेणे टाळायला हवे. खासकरुन आंबट फळे किंवा त्यांचा रस घ्यायचे टाळा.
livestrong.com
असे कोणतेही थंड पेय पिऊ नका जे तुमच्या दातांची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात. मसालेदार पदार्थांचे प्रमाण कमी करावे कारण असे पदार्थ खाल्याने दातांचं नुकसान होतं. आपल्या रोजच्या आहारात फायबरचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ खावेत. 
३) कॅल्शिअम असलेले पदार्थ खावे
दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम सर्वात महत्वाचे असते म्हणूनच दातांच्या समस्या दूर करण्यासाठी कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचं आहे. दुधापासून तयार झालेल्या पदार्थांमध्ये कॅल्शिअम अधिक प्रमाणात असतं हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यासोबतच पालेभाज्या आणि ड्राय फ्रूट्स सारख्या पदार्थांमध्येही तुम्हाला चांगल्या प्रमाणात कॅल्शिअम मिळतं.

४) भरपूर पाणी प्यावे
तज्ञ नेहमीच सांगतात की आपण दिवसभरात कमीत कमी दोन लिटर तरी पाणी पिणे गरजेचे असते. ज्यामुळे आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे रक्तसंचार होण्यास मदत होते आणि शरीरामधील टॉक्सिन्स बाहेर पडायलाही मदत होते. जेवणानंतर चांगल्या प्रकारे गुरळा करणे अत्यंत गरजेचे असून त्याने दातांमध्ये अडकलेले पदार्थ निघून जायला मदत होते. तसेच नियमित पाणी प्यायल्याने तोंडाला दुर्गंधी कमी येते, ज्यामुळे दात नेहमी स्वच्छ राहण्यास मदत होते. 
५) रूट कॅनल करा
डॉक्टर बऱ्याचदा ढिसूळ दातांना मजबूत करण्यासाठी रुट कॅनल  करण्याचा सल्ला देतात. जर तुमचा कोणताही दात तुम्हाला जर कमजोर वाटत असेल तर त्याच्या रुट कॅनलने दातांमध्ये येणाऱ्या झिणझिण्या बंद होण्यास मदत होते. 
thehealthsite.com
                    आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या