वर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या ५ गोष्टी करा

वर्कआऊट बरोबर फिटनेससाठी या गोष्टी करा


आपल्यापैकी असे बरेच लोक असतील ज्यांना जिममध्ये तासंतास घाम गाळूनही शरीरावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. याचा अर्थ एकच आहे की ते जे काही वर्कआऊट करत आहेत त्याचा त्यांना पूर्ण फायदा मिळत नाहीये. 
freeimages.com

ह्यात बहुतांश लोकांचा हाच समज असतो की रोजच्या रोज वर्कआऊट केले म्हणजे आपण एकदम फिट होऊन जाऊ. पण हे खरे नाही. फिट राहण्यासाठी तुम्हाला वर्कआऊट करण्यासोबतच या ५ गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

१) स्ट्रेचिंग
जर आपण हेव्ही एक्सरसाईज करत असाल तर व्यायाम केल्यानांतर स्ट्रेचिंग न केल्यास तुमच्या बॉडी मुव्हमेंटमध्ये थोड्या मर्यादा येतात किंवा ईजा होण्याची शक्यता वाढू शकते. वर्कआऊटनंतरही तुम्हाला तुमचे शरीर लवचिक राहावे असे वाटत असेल, तर यासाठी ८-१० मिनिटे स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे.
२) शांत झोप
जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपले शरीर दिवसभराच्या कामातून आलेल्या थकव्यातून रिकव्हर होत असते. जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर रोजच्या रोज शांत आणि पुरेशी झोप अतिशय गरजेची आहे. अन्यथा पूर्ण दिवस तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. रोज कमीत कमी ७ तास तरी झोपलेच पाहिजे. 
३) हायड्रेट
कोणतेही एक्सरसाईज केले की त्यानंतर शरीरातून खूप घाम येतो. ह्याच घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण कमी होते. म्हणूनच एक्सरसाईजनंतर शरीर चांगल्या प्रकारे हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणी जरूर प्यायले पाहिजे.


४) बॉडी पोश्चर
आजकालच्या कामाच्या स्वरूपामुळे बऱ्याच लोकांना तासंतास एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते परंतु ह्या अशा कामाच्या स्वरूपामुळे शरीराचा शेप कालांतराने बिघडू लागतो. यासाठी बसल्या जागीच कमीत कमी ५० सेकंद बॉडी मुव्ह करायची स्वतःला जाणीवपूर्वक सवय लावा. त्यामुळे शरीरात रक्तसंचार सुरळीत होण्यास मदत होऊन बॉडी पोश्चरही नीट राहील.

५) हेल्दी डाएट
तुम्ही कोणताही एक्सरसाईज करा ते केल्यानंतर आपल्याला भूक लागते. भूक लागल्यावर फॅट्सयुक्त आहार घेणे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. अन्यथा तुम्ही केलेल्या वर्कआउटचा काहीही फायदा तुमच्या शरीराला मिळणार नाही. कारण फॅट्समुळे पचनक्रिया मंदावून शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी चांगले पोषक अन्न घेणे, अत्यंत गरजेचे आहे. 

ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला  स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा  वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळेआपल्या  आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्यापुस्तकातत्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या