वारंवार केसगळती होत असेल तर करा ही '५' योगासने!

वारंवार केसगळती होत असेल तर करा ही '५' योगासने!

आजकालच्या आधुनिक, धावपळीच्या आणि सगळीकडे प्रदूषण असलेल्या जीवनात केसगळतीची समस्या बऱ्याच लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे

thehealthsite.com

त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत

पण यावर नियमित योगसाधना हा एक उत्तम उपाय असून केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होण्यास मदत तर होतेच शिवाय मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून देखील सुटका होते. 

भुजंगासन

वारंवार पित्त होण्यामुळे केसगळती व्हायला सुरवात होते त्यामुळे जर पित्त नियंत्रित ठेवायचे असेल तर भुजंगासन खूप फायदेशीर ठरते. 

happyhindi.com

पवनमुक्तासन

या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारण्यास मदत होते परिणामी कंबरेच्या खालचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. पोटातील गॅस जर तसाच राहिला तर त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात म्हणूनच हे आसन उपयुक्त आहे.

sehatgyan.com

वज्रासन

वज्रासनामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास चांगल्या प्रकारे मदत होऊन अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते, जेणेकरून पित्ताच्या समस्या कायम दूर राहतात. तसेच वज्रासनामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. mahipoweryoga.com

अधोमुख शवासन

या आसनामुळे संपूर्ण शरीरामध्ये रक्तसंचार सुरळीत होण्यास मदत होते. तसेच डोक्याला रक्ताचा उत्तम प्रकारे पुरवठा होवून थकवा दूर होण्यास मदत होते. निद्रानाश आणि ताणाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते. 

healthunbox.com

सर्वांगासन

या आसनामुळे थायरॉईड ग्रंथीचे चांगल्या प्रकारे पोषण होऊन पचनतंत्र सुधारायला मदत होते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाढायला लागतो. त्यामुळे केसगळती, केस पांढरे होण्याच्या समस्या सहजच कमी होतात

thehealthsite.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या