जेवण केल्यानंतरही सतत भूक लागते? 'या' सवयी बदला

जेवण केल्यानंतरही सतत भूक लागते? 'या' सवयी बदला
आपल्यापैकी बरेच असे लोक असतील ज्यांना जेवण केल्यानंतरही काही वेळात भूक लागते. पण ह्याकडे तसं पाहायला गेले तर कुणी फारसं लक्ष देत नाही. 
lokmat.com
पण यामागे काहीतरी कारण असू शकतं आणि जर असं नेहमीच होत असेल तर याचं कारण जाणून घेणे जास्त गरजेचं आहे आणि ज्या चुका आता होत आहेत त्या परत न करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. 


नाश्ता कमी करणे
जर तुम्ही नाश्ता हलक्या पदार्थांचा केला असेल तर तुम्हाला थोड्या वेळाने भूक लागणे स्वाभाविक आहे. असे नेहमीच म्हटले जाते की सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचा मानला जोता. त्यामुळे तज्ञ नेहमीच आपल्याला रोजच नाश्ता आवर्जून करण्याचा सल्ला देतात. तसेच जर तुम्ही नाश्त्यात पौष्टीक आहार घेतला तर दिवसभर तुम्हाला चांगले काम करण्याची एनर्जी मिळेल. पण जर नाश्ता हलका आणि कमी केला असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागू शकते.
घाई घाईत खाणे
काहीही खात असताना जर ते योग्यप्रकारे खाल्लं नाही तर जेवण केल्यावर तुम्हाला पुन्हा भूक लागू शकते. म्हणूनच जेवण करताना जर तुम्ही घाईने खाल्ले असेल तर तुम्हाला पुन्हा भूक लागण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे काहीही खाताना ते हळूहळू आणि नीट चांगल्या प्रकारे चाऊनच खावं. यामुळे तुम्ही खाल्लेल्या कोणत्याही पदार्थाची पचनक्रिया चांगली होण्यास मदत होईल. त्यासोबतच त्यांच्या पोषक तत्वांमुळे तुम्हाला ऊर्जा देखील चांगल्या प्रकारे मिळेल.

freepik.com
प्रोटीन आणि फायबरची कमतरता
आपल्या शरीराची भूक आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्या शरीराला फायबर खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या खाण्यामधून योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर घेत नसाल तर तुम्हाला सतत भूक लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात होऊ शकते. जेव्हा तुम्ही प्रोटीन आणि फायबर हे तत्व असलेले पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करता तेव्हा ते पदार्थ तुमची भूक शांत करण्यासाठी मदत करतात.
जास्त चहा पिणे
जर तुम्हाला दिवसभरात सतत चहा पिण्याची सवय असेल तर तुम्हाला भूक लागण्याची शक्यता अधिक होते कारण जास्त चहा प्यायल्याने त्यामधील कॅफ़िनमुळे भूक मरते पण तुम्हाला सतत काहीतरी खाण्याची इच्छा सुद्धा सातत्याने होत राहते. चहामध्ये असलेलं निकोटीन आपल्या शरीरात भूक वेगळ्या प्रकारे वाढवायला मदत करतं आणि खासकरून अशामुळे मसालेदार पदार्थ खाण्याची जास्त आवड निर्माण होते.

123rf.com
सॉफ्ट ड्रिंक आणि सोडा
अधिक प्रमाणात जर कोल्ड ड्रिंक आणि सोडा पिण्याची जर सवय असेल तर पचनक्रिया प्रभावित होण्याची शक्यता जास्त असते. तज्ञांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की हे पेय सतत पिणाऱ्यांना सतत भूक लागू शकते.
कमी पाणी पिणे
आपले शरीर हे ७२% पाण्याने बनलेले असल्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. हा आपली भूक शांत करण्याचा सर्वात चांगला पर्याय असून अनेकदा असे होते की योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होत जाते. अशामुळे आपल्याला भूक लागू शकते. पण मुळात तुम्हाला भूक लागलेली नसते. ते असे होते कारण आपण पाणी कमी प्यायल्याने आपल्याला सारखं असं वाटत असतं.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या