सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

किडनीस्टोनच्या त्रासातून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी खास उपाय

किडनीस्टोनच्या त्रासातून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी खास उपाय


आपल्या शरीराला होणाऱ्या अनेक त्रासांपैकी किडनीस्टोनचा त्रास अत्यंत वेदनादायी त्रास आहे. 
किडनीस्टोनचा त्रासातून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी खास उपाय
http://zeenews.india.com
जर वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास त्या रूग्णाला वारंवार असह्य वेदनांचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्याचे कोणतेही काम करणेदेखील कठीण होऊ शकते.

जेव्हा आपल्या मूत्राशयाच्या मार्गात खडे निर्माण झाले असतील तर त्याच्या सुरूवातीच्या टप्प्यावर आपल्याला त्याचा धोका ओळखता आला तर काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते. मात्र मूतखड्याचा आकार मोठा असल्यास शस्त्रक्रियेच्या माध्यमातून मूतखडा काढावा लागतो. 
आपल्या शरीरात रोज तयार होणारे घातक पदार्थ मूत्राच्या, घामाच्या आणि गुदद्वारामार्गे बाहेर पडतात.लघवीमध्ये क्षार व इतर घटकांचे विरघळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मूतखडा निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं. म्हणूनच दिवसभरात आपण योग्य प्रमाणात पाणी प्यायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरात तयार होणारे विषारी पदार्थ आपोपापच शरीराबाहेर काढून टाकले जातील.
तर आपण आता ह्यावरील सोपे उपाय पाहुयात 

आवळा - 
ज्या लोकांना किडनीस्टोनचा त्रास असेल त्या लोकांनी आवळा खाणं फायदेशीर आहे. आवळ्याचे चूर्ण मुळ्यासोबत खाल्ल्याने किडनीस्टोनचा त्रास कमी होण्यास खूपच मदत होते.
तुळस - 
तुळशीपानांमध्ये व्हिटॅमिन बी घटक असल्याने किडनीस्टोनच्या रूग्णांसाठी तुळशीची पानं अतंत्य फायदेशीर आहेत.
वेलची - 
किडनीस्टोनचा त्रास असलेल्या लोकांना वेलची देखील फायदेशीर आहे. चमचाभर वेलची, कलिंगडाच्या बीया, दोन चमचे खडीसाखर, कपभर पाणी मिसळून ते चांगल्याप्रकारे उकळून घ्या आणि सकाळी तसेच संध्याकाळी हे मिश्रण प्यायल्यास मूत्रामार्गे किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते.
जीरं - 
किडनीस्टोनच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी जीरं अत्यंत फायदेशीर असून त्यासाठी थोडे जीरं आणि साखर समप्रमाणात मिसळून ते थंड पाण्यासोबत प्यावे. हे मिश्रण दिवसातून 3 वेळेस घेतले तर ते अधिक फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते. ज्या लोकांना किडनीस्टोनचा त्रास असेल त्या लोकांनी आवळा खाणं फायदेशीर आहे. आवळ्याचे चूर्ण मुळ्यासोबत खाल्ल्याने किडनीस्टोनचा त्रास कमी होण्यास खूपच मदत होते.
तुळस - 
तुळशीपानांमध्ये व्हिटॅमिन बी घटक असल्याने किडनीस्टोनच्या रूग्णांसाठी तुळशीची पानं अतंत्य फायदेशीर आहेत.
वेलची - 
किडनीस्टोनचा त्रास असलेल्या लोकांना वेलची देखील फायदेशीर आहे. चमचाभर वेलची, कलिंगडाच्या बीया, दोन चमचे खडीसाखर, कपभर पाणी मिसळून ते चांगल्याप्रकारे उकळून घ्या आणि सकाळी तसेच संध्याकाळी हे मिश्रण प्यायल्यास मूत्रामार्गे किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते.
जीरं - 
किडनीस्टोनच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी जीरं अत्यंत फायदेशीर असून त्यासाठी थोडे जीरं आणि साखर समप्रमाणात मिसळून ते थंड पाण्यासोबत प्यावे. हे मिश्रण दिवसातून 3 वेळेस घेतले तर ते अधिक फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या किडनीस्टोन बाहेर पडण्यास मदत होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे ...