गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

सावधान ! ऑफिसमध्ये जास्तवेळ थांबताय ? हा होईल त्रास

सावधान ! ऑफिसमध्ये जास्तवेळ थांबताय ? हा होईल त्रास

आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही काळवेळ न पाहता स्वत:ला कामात गुंतवून घेताय का? वेळी-अवेळी, खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष करुन कामालाच प्राधान्य देताय का? 
punjabi.dailypost.in
तर जरा थांबून नीट विचार करा कारण ही अशी जीवनशैली तुमच्यासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकते.

याचा परिणाम केवळ तुमच्या शरिरावरच नाही तर कौटुंबिक स्वास्थ्यावरही होऊ शकतो हे हल्लीच्या पिढीवरच्या तज्ञांच्या एका संशोधनात निर्दशनास आले आहे.
जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणे
कामाच्या वेळा संपल्यानंतरही बऱ्याचशा ऑफिसमधल्या बॉसना त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून काम करण्याची अपेक्षा असते. बऱ्याचवेळेला या अपेक्षा पूर्ण करण्यााठी कर्मचारी नातेवाईक संबध बाजूला ठेवून त्यांच्या ऑफिसच्या कामाला जास्त प्राधान्य देतात. पण ऑफिसच्या कामाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे बरेचसे कर्मचारी घरातील जबाबदाऱ्यांकडे नकळतपणे दुर्लक्ष करतात.
gettingsmart.com

संशोधन
ह्याचसंबंधी अमेरिकेतील एका प्रसिद्ध विश्वविद्यालयात यासंदर्भातील एक रिसर्च करण्यात आला. त्यांच्या असे लक्षात आले की बऱ्याचवेळा आपल्या वाढीव अपेक्षा या नेहमी घातक असतात. यामुळे केवळ कर्मचाऱ्यांची चिंता वाढत जाते आणि त्याचे परिणाम म्हणून त्यांचे नातेसंबंध आणि स्वास्थावर त्याचा कालांतराने वाईट परिणाम होतो. त्यांच्या वैवाहिक आयुष्यावरही याचा नकारात्मक परिणाम व्हायला लागतो.
lyrisbacchus.com
यातून आपल्याला चांगल्या प्रकारे बाहेर पडायचे असल्यास काही तास विश्रांती घेणं अत्यंत गरजेचे असून ह्यावरील एक संशोधन शिकागोतील अॅकेडमी ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक बैठकीत हल्लीच सादर केलं गेलं आहे.  
Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...