सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

मिठाचे असेही काही फायदे

मिठाचे असेही काही फायदे


salt

आपण कोणीही मीठाशिवाय जेवणचा विचारही करू शकत नाही. मीठ जसे आपल्या आहरात चव वाढवण्याचं काम करते तसेच ते इतर आरोग्यदायी फायद्यांसाठीही अनेकप्रकारे वापरता येऊ शकते. तसेच मीठ सौंदर्य खुलवण्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.


चेहर्‍यासाठी मीठ आहे फायदेशीर –

मीठामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होते. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा आपल्या त्वचेवर मृत पेशी साचून राहण्याचं प्रमाण अधिक असतं. अशावेळेस डेड स्कीनचा थर नैसर्गिकरित्या जर आपल्याला काढून टाकायचा असेल तर मीठ अत्यंत फायदेशीर आहे.

घरगुती स्क्रब बनवण्यासाठी –
मीठामध्ये ऑलिव्ह ऑईल, लॅव्हेंडर ऑईल, बदामाचं तेल मिसळून ते चांगल्या स्क्रबरने चेहऱ्यावर लावल्यास मृत पेशींचा थर निघून जाण्यास मदत होते.

आपल्या शरीरातील पर्याप्त व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे अनेकदा आपली नखं कमजोर होतात. अशावेळेस चमचाभर मीठामध्ये, चमचाभर लिंबाचा रस, चमचाभर बेकिंग सोडा आणि कपभर कोमट पाणी मिसळून ही पेस्ट जर आपल्या नखांवर नियमितपणे लावल्यास ते मजबूत आणि चमकदार होण्यास मदत होईल. 
दातांचा पिवळेपणा कमी करायचा असेल तर एक चमचा मीठ, दोन चमचे बेकिंग पावडर मिसळून ही पेस्ट टुथब्रशवर घेऊन लावा. यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...