वजन कमी करण्यासाठी ही गोष्ट नक्की अमलात आणा

वजन कमी करण्यासाठी ही गोष्ट नक्की अमलात आणा 

हे आता जगजाहीर आहे की नियमित व्यायामाने लठ्ठ लोकांना हृदयासंबधित आजारापासून सुटका मिळू शकते तसेच लठ्ठपणामुळे उद्भवणारा हृदयविकाराचा धोका देखील टळू शकतो. 
Senior Mexican Woman Working Out
नियमीत व्यायाम केल्याने साहजिकच आपले आरोग्य निरोगी राहू शकते.

असा अभ्यास तज्ञांकडून वेळच्यावेळी करण्यात आला आहे आणि तो बऱ्याचशा माध्यमातून सार्वजनिकही आहे जेणेकरून तो सामान्य लोकांनाही वाचता येईल. लठ्ठ माणसांना होणारे हृदयासंबधित आजार आपण सहजपणे रोखू शकतो परंतु त्यासाठी नियमीत व्यायामाची गरज आहे. लठ्ठपणामुळे हृदयासंबधित आजार बळाविण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. ज्या व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स (BMI) हे जर ३० पेक्षा जास्त झाले तर त्या व्यक्तीला लठ्ठपणाचा धोका निर्माण होऊ शकतो.
तज्ञांच्या अभ्यासात असे नेहमीच सांगितले गेले आहे की लठ्ठपणा कमी करण्यास सर्वात महत्वाचे आहे रोजच्या रोज शारीरिक हालचाली करणे. कारण लठ्ठपणामुळे हृदयासंबधीत आजार होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच शारीरिक हालचाली होणे अत्यंत महत्वाचे आहे.
वजन आटोक्यात असलेल्या व्यक्तीस हृदयासंबधीत आजार होण्याची शक्यता कमी असते. जर लठ्ठ व्यक्तींकडून नियमित व्यायाम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केला जात असेल, तर त्यांचा हृदयासंबधित धोका बळावण्याची शक्यता कमी असते. याशिवाय अति धूम्रपान, दारू पिल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार जास्त प्रमाणात होतात. नियमित केलेल्या शारीरिक व्यायामामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, जास्त कोलेस्ट्रॉल आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका कमी होण्यास भरपूर मदत मिळते. नियमीत व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या