पाठदुखीवर साधे-सोपे उपाय

पाठदुखीवर साधे-सोपे उपाय

पुरूषांपेक्षा महिलांना पाठदुखीच्या समस्येला हल्लीच्या काळात जास्त सामोरे जावे लागते अशी माहिती हल्लीच तज्ञांच्या एका संशोधनातून पुढे आली आहे. 
याचे मुख्य कारण म्हणजे एकाच जागेवर धिक काळ बसून राहणे, अशक्तपणा, दिनक्रमामधील बदल यासारखी आजच्या जीवनशैलीशी निगडित आहेत.

पाठदुखीच्या त्रासामुळे हल्लीच्या महिलांना घरातील कामे करणे देखील कठीण होते. पण संशोधकांच्या अहवालानुसार आपण घरगुती उपचाराने सुध्दा पाठदुखीवर नियंत्रण मिळवू शकतो. कोणते घरगुती उपाय पाठ दुखण्यावर उपयोगी ठरतात ते आपण आता पाहूया –

१) तुळशीची पाने ही आरोग्यासाठी चांगली असून ती गरम पाण्यात उकळून प्यायल्याने पाठदुखी थांबण्यास मदत होते.
२) अद्रक, लंवग आणि काळी मिर्चीचा चहा आपल्या रोजच्या पाठदुखीच्या त्रासापासून सुटका करण्यास फायदेशीर ठरू शकतो.
३) तज्ञांचा अभ्यास असे दर्शवितो की पाठीच्या वेदना असणा-या व्यक्तींना विश्रांती घेण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा व्यक्तींनी योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या रोज सोपे व्यायाम करावेत.
४) थोड्या वेळासाठी जर आपल्याला पाठदुखीचा त्रास झाला  असेल तर पटकन करता येणारा उपाय म्हणजे बर्फाने पाठीला शेकावे जेणेकरून तुम्हाला तात्काळ आराम मिळेल. 
५) बहुतेक लोक त्यांच्या दैनंदिन हालचाली करत असताना त्यांना बऱ्याचवेळा फारच अस्वस्थ वाटते कारण त्यांच्या पाठीवर अनावश्यक ताण येत असल्यामुळे असे होत असते. अशामुळे अशा व्यक्तींनी आपली प्रत्येक हालचाल योग्यरीत्या करावी.
६) पाठदुखीनं जर आपण त्रस्त असाल तर दुधात मध घालून प्यायल्याने पाठदुखी थांबते.
७) तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कमरेचा व्यायाम केल्याने पाठदुखीवर सहजपणे नियंत्रण मिळवता येते.


Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या