ऋतुमानानुसार पौष्टिक अन्न खा

ऋतुमानानुसार पौष्टिक अन्न खा


ऋतुमानाप्रमाणे आणि आपल्या प्रदेशानुसार काही पदार्थांचा आहारात समावेश असणं, ही निरोगी राहाण्याची गुरुकिल्ली आहे असं नेहमीच तज्ञांकडून वेळोवेळी सांगितले जाते. 
त्यामुळे आता सध्या चालू असलेल्या पावसाळ्याच्या ऋतूमध्येही संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. 

सध्याच्या हवामानानुसार आहारात नेमके कोणते पदार्थ असणं आवश्यक आहे याची माहिती सुप्रसिद्ध सेलिब्रेटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिली आहे.

पावसाळ्यातील वातावरण हिरव्या पालेभाज्यांसाठी योग्य नसते. त्यामुळे पालक, मेथी, माठ, ब्रोकोली, लेट्यूस, केल (kale), आणि रुकोला (rucola) यांसारख्या भाज्या नैसर्गिकपणे उगवत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात काही अपवाद वगळता दुधी, भोपळा, कारली, गिलके (घोसाळे) यांसारख्या वेलीवरील भाज्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या तुम्हाला अजूनही मिळत असतील, तर त्या साठवलेल्या किंवा आयात केलेल्या असू शकतात.

धान्य
नाचणी हे पावसाळ्यात सेवन करण्यासाठी अतिशय उत्तम धान्य असून तुम्ही नाचणीची लापशी, भाकरी किंवा नाचणीचे पापड असे नाचणीचे चविष्ट पदार्थही ह्या दिवसात खाऊ शकता. मल्टिग्रेन ब्रेड्स, बिस्किटं यांचं सेवन जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करा. तांदूळ, ज्वारी आणि गहू ही धान्यं तुम्ही वर्षभर खाऊ शकता. मक्याचं कणीस खाणं हाही एक उत्तम पर्याय आहे.
डाळी
पावसाळ्यात बरेचसे लोक हे मांसाहार करणं टाळतात, त्यामुळे उन्हाळ्यात निवडून आणि वाळवून ठेवलेली कडधान्यं आणि डाळी हीच प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजं आणि तंतुमय पदार्थ यांचा प्रमुख स्रोत असतात. काहीजण कडधान्यांच्या वड्याही करतात. वड्या करताना मिश्र कडधान्यं वापरण्यावर भर द्यावा. कडधान्यांचे पापडही केले जातात. त्यामुळे कडधान्यं ही विविध पदार्थांच्या रूपानं आपल्या समोर येतात असं म्हणता येईल.

'गरमागरम आणि खमंग भजी' ही पावसाळ्याची सर्वपरिचित खासियत! जी सर्वांनाच आवडते, भजी तळण्यासाठी नेहमी फिल्टर्ड शेंगदाण्याचं, मोहरीचं किंवा खोबरेल तेल यांचा वापर करावा. एकदा तळण्यासाठी वापरलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणं टाळावं. तुमच्या आहारात जर योग्य फॅट्सचा समावेश असेल तरच शरीर डी जीवनसत्त्व शोषून घेण्यास सक्षम होतं. याशिवाय आवश्यक फॅट्स रक्तातील साखरेचं प्रमाण कायम राखण्यास मदत करतात. त्यामुळे पावसाळ्याची खासियत भजी ही चविष्ट आणि पौष्टिक असणं महत्वाचे आहे.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या