भिजवलेल्या बदामांचे 5 आरोग्यदायी फायदे

भिजवलेल्या बदामांचे 5 आरोग्यदायी फायदे


रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय हे अनेकांना माहित नसते. 
मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे. बदाम हे आरोग्यदायी आहेत. 

त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून  घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामामध्ये पोटॅशियम, फायबर, प्रथिने आणि स्वस्थ चरबीचा एक चांगला स्त्रोत असतो. कॅल्शियम आणि लोह हेदेखील बदामांमध्ये आढळतात.

बदाम हेल्थसाठी फार उपयोगाचा आहे हे हजारो वर्षापासून जगाला माहित आहे. पण जाता येता नुसते न भिजवलेले बदाम खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम खाणे कधीही फायद्याचे असे एका ठिकाणी वाचनात आले. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला बघून यामागचे नेमके कारण काय हे जाणून घेतले अन लिहिली ही भिजवलेल्या बदामांच्या आरोग्यदायी फायदयाची यादी.

भिजवलेले बदाम पचनशक्ती सुधारण्यास मदत करते
 Fit, young woman holding a circle made out of vegetables over her abdomen
तज्ञांच्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते 
Ensuring her vitals are nominal before the procedure
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. 

हृदयाचे कार्य सुधारते 
बदामामुळे  हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा. 

वजन घटवण्यास मदत होते  
You can get the same results
तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर आहात ? मग नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते
आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळीअवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे. बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते. 

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या