चिंता सोडा आणि कामाला लागा

चिंता सोडा आणि कामाला लागा 

"मन चिंती ते वैरी न चिंती" ही म्हण प्रचलित आहेच. आपण सदा कुठल्यातरी चिंतेत असतो. 

कधी भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींमध्ये अडकून बसतो तर कधी भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींची चिंता करत बसतो.
कुठल्याही गोष्टीची काळजी केल्यामुळे आपले प्रश्न आणि समस्या सुटणार नाहीत, उलट त्याचा गूंता अजूनच वाढत जाईल. सतत चिंता करत राहिल्याने आपण एखाद्या गोष्टीचा चारही बाजूने विचारच करू शकत नाही. नुसती काळजी करत बसल्याने आपण आपली मानसिक स्थिती कळत नकळत बिघडवत असतो. 

आपण आपल्या प्रगतीचा रथ जेंव्हा जोरात हाकत असतो तेंव्हा जर आपण चिंतेचा लगाम लावला तर आपणच आपल्याला दुबळे बनवतो. ज्यावेळी आपल्या मनात चिंता, काळजी, भय असते त्यावेळी कोणीही आपले महत्वाचे काम योग्य वेगाने व योग्यरीत्या करू शकत नाही, त्याला आपले १००% कौशल्य देऊ शकत नाही कारण त्या कामात आपले मन चिंतेमुळे एकाग्र होऊ शकत नाही. चिंतेमुळे आपण कमकुवत बनतो व आपल्यात क्षमता असूनही आपण आपल्या कामाला न्याय देऊ शकत नाही. सततच्या चिंतेने आपण शारीरिक तसेच मानसिक आजारांनाही निमंत्रण देत असतो.

जेंव्हा आपण चिंता न करता आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो तेंव्हा आपल्याला आपल्या ध्येयाप्रत जाण्याचा राजमार्ग सापडतो. आपण त्रुटींवर भर न देता आपल्या कल्पक बुद्धीचा योग्य वापर करून आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी होऊ शकतो. कधीही चिंतेत न अडकता कुठल्याही गोष्टींचा सारासार विचार करण्यातच खरा लाभ आहे.


Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या