जे घडतं ते नेहमी आपल्या चांगल्यासाठीच घडतं

जे घडतं ते नेहमी आपल्या चांगल्यासाठीच घडतं 

आपल्या जीवनात जेंव्हा एखादी घटना घडते तेंव्हा त्यांच्यावरची आपली प्रतिक्रिया ही खूप महत्वाची असते. एखादी घटना आपल्या मनासारखी घडली तर आपण आनंदित होतो व आपला दिवसही चांगला जातो. 


तेच जर एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडल्यास आपण दु:खी होतो व आपला दिवसही निराशाजनक जातो. ह्याचा अर्थ एखादी घटना ठरवणार की आपण आनंदी की दु:खी जीवन जगायचं. किती विरोधाभास आहे ना! कुठल्याही घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जेंव्हा सकारात्मक असतो तेंव्हा आपण त्या घटनेतून प्रेरणा घेऊन नवीन काहीतरी निर्माण करू शकतो. तेच जर आपला दृष्टिकोन नकारात्मक असेल तर आपण त्या घटनेमध्ये स्वतःला हरवून बसतो व अजून नवीन संकटांना आमंत्रण देऊ लागतो.

आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. जेंव्हा ह्या सकारात्मक दृष्टीकोनातून आपण ह्या घटनेकडे बघतो तेंव्हा कुठल्याही परिस्थितीवर मात करून आपण आपलं ध्येय नक्कीच गाठू शकतो. आपण जर विचार केला की, आपल्या भूतकाळात जेंव्हा आपल्यावर संकटं आली तेंव्हाच्या कठीण काळात नक्की तुम्हाला जाणवेल की तुमची नक्कीच काहीतरी प्रगती झाली आहे. आपला कोणताही कठीण काळ हा आपल्याला खूप काही नवीन शिकवून जात असतो व आपल्यामध्ये आमूलाग्र बदल देखील घडवत असतो. 

म्हणूनच जेंव्हा जे काही घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडतं ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून कुठल्याही घटनेकडे पाहिल्यास आपण नक्कीच त्यातून काहीतरी नवीन चांगलं निर्माण करू शकतो व आपलं जीवन चांगल्याप्रकारे व्यतीत करू शकतो. अर्थातच आपल्या जीवनाचा स्तर ऊंचावू शकतो.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या