शनिवार, ७ जुलै, २०१८

आठवड्यात एक दिवस तरी व्यायामापासून विश्रांती घ्या

आठवड्यात एक दिवस तरी व्यायामापासून विश्रांती घ्या

संपूर्ण आठवड्यात व्यायाम करण्यापासून एक दिवस विश्रांती घेणे का महत्त्वाचे आहे हे खाली दिलेल्या महत्वपूर्ण माहितीतून  जाणून घेणे पुरेसे आहे


दररोज व्यायाम करणे  हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे, परंतु सात दिवसांच्या आठवड्यात निदान एक दिवस तरी व्यायाम न करणे हे देखील आपल्या शरीराच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
आज प्रत्येकालाच दररोजच्या ऑफिस आणि व्यावसायिक ठिकाणी योग्य पद्धतीने काम करणे आवश्यक आहे कारण ते प्रत्येकाचे कर्तव्य / नोकरी आहे.

पण अशामुळे आपल्या शरीराला हवा तेवढा आराम मिळत नाही आणि सतत थकल्यासारखे वाटत राहते.

तसेच, ह्या सगळ्यांबरोबर जर व्यायाम करायचा असेल तर आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये ते थोडेसे अवघड बनते. मग शरीर नेहमीच थकल्यासारखे वाटते.

आपण व्यायामशाळेत किंवा पार्कमध्ये चालण्यासाठी दररोज जात असाल, तर आठवड्यात एक दिवस आपल्या शरीरास संपूर्ण आराम द्या म्हणजे तो आपल्या शरीरातील थकवा दूर काढून टाकायला मदत करेल , तसेच व्यायाम केल्याने होणाऱ्या वेदना देखील कमी होतील जे पुढील दिवसासाठी पुन्हा व्यायाम आणि आपली दिवसभरातील इतर कामे करण्यासाठी आपल्याला सज्ज करेल.
व्यायामामुळे, आपले सर्व स्नायू व्यवस्थित काम करतात आणि आपले पाचक तंत्र देखील चांगले होते.


असे म्हटले जाते की व्यक्तीने निरोगी जीवनशैली जगण्याकरता व्यायामाबरोबर प्रत्येक लहान अंतराने दिवसातून पाच वेळा खाणे आवश्यक आहे. या पाच जेवणांमध्ये आपण कोणत्याही फास्ट फूड, तेलकट पदार्थ किंवा मिठाईच्या ऐवजी पौष्टिक अन्न घेणे आवश्यक आहे.
Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


४) अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...