नेहमी समस्यांचे मूळ कारण शोधा

नेहमी समस्यांचे मूळ कारण शोधा 

सध्याच्या काळात आपल्याला अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जिला काही समस्या आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, गृहिणींना, नोकरी करणाऱ्यांना, उद्योजकांना, इत्यादी.

थोडक्यात काय तर समाजातील सर्वच स्तरातील लोकांना विविध प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत.
खूप जण आपल्या समस्यांपासून पळायची वाट शोधात राहतात. एखाद्या समस्येला धीराने तोंड देण्याऐवजी पलायनवाद अवलंबताना दिसून येतात. खरं पाहता जेंव्हा एखादी समस्या निर्माण होते तेंव्हा त्या समस्येतच त्याचं समाधान लपलेलं असतं.
पण आपण सारासार विचार न करता त्या समस्येपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थातच समस्येच्या समाधानापासून दूर पळत असतो. कधीही समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्यास अथवा सर्व बाजूंनी विचार केल्यास नक्कीच आपल्याला समस्येचं समाधान मिळेल. अशावेळेस होणारा आनंद हा काही औरच असतो. 
जेंव्हा एखादी व्यक्ती आलेल्या समस्यांनी हैराण होते आणि आपल्या नकारात्मक विचारांनी निराशावादी बनते, तेंव्हा त्या समस्येच्या अति ताणाने अजून समस्यांना आमंत्रित करते.

जर आपण आपल्या जीवनात आलेल्या समस्येपासून दूर न पळता त्यांना धैर्याने सामोरे गेलो आणि जर त्याचे नीट निरीक्षण केले तर आपल्याला जाणवेल की बहुतेक वेळा आपण घाबरून समस्येचा डोंगर बनवलेला असतो पण वास्तविक पाहता प्रत्येक समस्येचं समाधान हे त्या समस्येतच दडलेलं असतं. फक्त आपला त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो. जेंव्हा आपण छोट्या समस्यांना धीराने सामोरे जातो तेंव्हा मोठ्या समस्यांचे समाधान मिळवण्याची आपली मानसिकता आपोआपच बनत जाते. म्हणूनच कुठल्याही समस्येला धीराने सामोरे जाऊन आपण आपल्या आयुष्यात समाधान व आनंद प्राप्त करू शकतो.
  

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या