सकारात्मक विचारांचा फायदा

सकारात्मक विचारांचा फायदाआपल्या मनात प्रत्येक क्षणी निरनिराळे विचार येत असतात. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. 

जेंव्हा आपण सकारात्मक विचारांनी प्रभावित असतो तेंव्हा आपल्या रोजच्या कामात आपल्याला यश मिळवणे सहज शक्य होते आणि आपण आपली नेहमीची कामे अगदी सहजपणे पार पाडू शकतो. 
पण जेंव्हा आपण नकारात्मक विचारांनी प्रभावित असतो तेंव्हा भीतीने ग्रासून गेलेलो असतो, त्यामुळे प्रत्येक कामात शंका निर्माण करून आपणच आपल्या रोजच्या कामात अडसर निर्माण करतो. म्हणूनच नेहमी मनात चांगले आणि सकारात्मक विचार आणणे हे आपल्यासाठी केंव्हाही हितावह आहे. जणू आपण आपल्या मनाला सुविचारांचे व सकारात्मक विचारांचे वळणच लावले पाहिजे.

जेंव्हा आपण नकारात्मक विचारांनी प्रभावित असतो, तेंव्हा आपल्या मनात एखाद्या भीतीने घर केलेले असते. एखादी गोष्ट अथवा काम सुरू करण्याच्या आधी आपण साशंक मनाने विचार केल्यास आपल्याला सर्व समस्याच नजरेस येतील व खरंच आपल्या आवाक्यातील कामही प्रथम आपल्या विचारांनी व कृतीने आपण कठीण करून ठेवतो. कारण सुरवातीलाच समस्यांचा पाढा वाचल्याने आपण ते काम करायला धजावतच नाही मग ते काम पूर्ण व्हायचा प्रश्नच येत नाही. तेच जर आपण आपल्या मनातील भीती दूर केली आणि आपले काम सकारात्मक विचारांनी सुरु केले तर नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यश मिळेल. सकारत्मक विचारांचा फायदा असा होईल की आपल्या प्रत्येक समस्येला आपण न घाबरता धैर्याने तोंड देऊ व अर्थातच आपल्याला हवे असलेलं यश मिळवण्यात नक्की यशस्वी होऊ.आपल्या मनातील भीतीला दूर सारा व आपल्या सकारत्मक विचारांनी आपल्या कामाला योग्य परिश्रमाची जोड देऊन आपल्या आयुष्यात यश व समृद्धी मिळवायला सज्ज व्हा.


Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या