निद्रानाशेच्या समस्येवर मात कशी कराल

निद्रानाशेच्या समस्येवर मात कशी कराल

आजकालच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आहाराच्या आणि झोपण्याच्या सवयीमध्ये अनेक लोकांच्या बाबतीत बदल झाले आहेत. 
उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, व्यायाम हा आवश्यक असतो. सोबतच रात्रीच्या वेळेस 7-8 तास शांत झोपही आवश्यक आहे.

त्यामुळे काही जण हट्टाने रात्री जागरणं करतात तर काहींना निद्रानाशेचा त्रास होतो. सुरूवातीला लहान वाटणारा हा त्रास हळूहळू गंभीर होऊ लागतो. मात्र अनेकांना आजकाल शांत झोप मिळणं कठीण झाले आहे. अनेकांना आज निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे. निद्रानाशेतून लाईफस्टाईशी निगडीत अनेक समस्या कालांतराने वाढू लागतात. मग या निद्रानाशेवर उपाय म्हणून तुमच्या आहारात योग्य बदल करून पहा किंवा तुम्ही मेंदुलाच वेळेत झोपी जाण्याचे संकेत दिल्यास तुम्हांला इतर उपायांची मदत घेण्याची गरजच पडणार नाही.
  
# केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम घटक मुबलक असतात त्यामुळे आपण जर रात्री झोपायच्या दोन तास अगोदर प्रमाणात केळी खाल्यास आपले मसल्स शांत होण्यास मदत होते. परिणामी निद्रानाशेवर नैसर्गिक उपायांनी मात करता येऊ शकते. रात्री झोपण्यापूर्वी पचायला हलके असणारे कार्ब्सयुक्त पदार्थ खाल्ल्यास शांत झोप येण्यास मदत होते. 
bananas on a wooden table
# शांत झोप मिळवण्यासाठी तुम्हांला झोपण्यापूर्वी केवळ श्वासावर पूर्ण लक्ष केंद्रित ठेवणं आवश्यक आहे ज्यामुळे तुम्ही दिवसभराच्या ताणापासून मुक्त होता आणि झोपही चांगली येते.
girl sleeping on a white pillow in bed at home Free Photo
# दूध हे पूर्णअन्न आहे, हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे त्याचा जाणीवपूर्वक आहारात समावेश करणं आरोग्यदायी आहे. दूधामध्ये झोपेला चालना देणारे घटक असल्याने रात्री झोपण्यापूर्वी जायफळाचे किंवा हळदीचं दूध पिणे फायदेशीर आहे.
Woman pouring milk from a bottle
हल्लीच्या धावपळीच्या काळात स्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम करणं फारच गरजेचं झालेलं आहे तसेच आपल्या रोजच्या आहारातून अनावश्यक कॅलरीज वाढणार नाही याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. तरच आपण दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री चांगली झोप घेऊ शकतो.


Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या