सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय वजन कमी करायला मदत करते

सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय वजन कमी करायला मदत करते

आपल्या आरोग्यावर आपण रोजच्यारोज घेत असलेल्या आहाराचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा याबाबत अनेक सल्ले आपल्याला मिळाले असतील पण तो आहार कधी घ्यावा? 
याबाबतची वेळदेखील तुमच्या आरोग्यावर कळत नकळत परिणाम करत असते आणि ह्यावरूनच तुमचे आरोग्य कसे असेल ते ठरते. 

आजकालच्या धकाधकीच्या बनत चाललेल्या आपल्या जीवनात खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या वेळा मोठ्या प्रमाणावर बदलत आहेत. याचा साहजिकच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पूर्वीच्या काळी सूर्यास्तापूर्वी आहार करण्याचा नियम असे. कदाचित  हेच त्यांच्या दीर्घायुषी आणि निरोगी आरोग्याचं गुपित असावं असं म्हटलं जातं. मग खरंच सूर्यास्तापूर्वी  जेवण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं का ते पुन्हा एकदा जाणून घेऊयात.

# रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी घेतल्याने ते पचायला खूप सोपे जाते. तसेच शरीरात कॅलरीज बर्न होण्यास शरीरातील यंत्रणांना अधिक वेळ मिळतो. रात्रीच्या वेळेस पचायला हलकं, कमी कॅलरीज असणारे पदार्थ खाण्यासाठी निवडा. 

# रात्री ९ च्यानंतर भरपेट जेवणाची सवय असेल तेर ते जाणीवपूर्वक टाळा. कारण रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्थेचं कार्य बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम झोपेवरही होऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवयही टाळा. यामुळे रात्री-अपरात्री वॉशरूमला जावं लागून तुमची झोपमोड होऊ शकते.

# संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय तुम्ही यशस्वीरित्या आजमावली तरीही अनेकदा रात्री भूक लागू शकते. अशा वेळेस आहारात कशाचा समावेश कराल? याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश वाढवा ज्यामुळे वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यास जास्तीतजास्त मदत होईल.

अनेकजण वजन कमी करण्यासाठी त्यांच्या रोजच्या आहारात लहानसहान बदल करतात. त्यामुळे योग्य आहारतज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या जीवनशैलीनुसार आहार आणि त्याच्या वेळा निश्चित करा जेणेकरून तुम्हीसुद्धा एक हेल्दी आयुष्य जगू शकाल.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.



खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता
Livewell- Lead meaningful life: 
आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:









Post a Comment

0 Comments