नेहमी आनंद आणि उदात्त गुणांना महत्व द्या

नेहमी आनंद आणि उदात्त गुणांना महत्व द्या 

आपल्यापैकी बरेच जण रोजच्या कामाच्या गडबडीत जीवनातील सौंदर्य पाहायला विसरतात, खरं पाहता रोजच्या जीवनातील अतिशय किरकोळ गोष्टीतसुद्धा अपूर्व सौंदर्य व एक खोल अर्थ लपलेला असतो जो आपल्याला रोजच्या घाईगडबडीत समजून येत नाही.
Happy family 

अशा वेळी या छोट्या गोष्टींनीच आपल्याला आपल्या लहानपणी कसा आनंद होत असे त्याची जरा शांत मनाने आठवण करून पहा. पावसाळ्यातील उमलणाऱ्या फुलांनी आपल्याला किती आनंद दिला ते नीट आठवा. 
Blonde girl with braided hair smelling pink flower in garden

या फुलावर उडणाऱ्या रंगीबेरंगी पाखरांना पाहून तुम्हाला झालेला आनंद आठवा. 
Child with daisy eyes.
एखाद्या सुंदर हवामानाच्या दिवशी तुम्ही तुमच्या सवंगड्यांबरोबर किती उत्साहाने खेळला होतात ते जरा नीट आठवा.
Mother And Daughter Planting Flowers Together.


तुमच्या मनात सध्याच्या स्थितीत काय चालले आहे ह्याचा विचार सध्या बाजूला ठेवा किंवा त्याला जास्त महत्व देऊ नका. त्यावर नियंत्रण ठेवा. आपल्यामधील जे उदात्त गुण आहेत, त्यांचाच नित्य विकास करा. जी आपली शाश्वत मूल्ये आहेत त्यासमोर आपल्या क्षणिक भावनांचा उद्रेक टिकता काम नये कारण त्याने आपल्याला नुकसानच होणार आहे. ज्या गोष्टी किंवा घटना शाश्वत टिकणाऱ्या आहेत त्यांनाच महत्व द्या. कारण एक गोष्ट कायम लक्ष्यात असू द्या आणि ती म्हणजे तुमच्यामागे तुमचे चांगले गुण व उदात्त कार्यच टिकणार आहे ज्याबद्दल लोकं नेहमीच चांगलं बोलणार आहेत आणि ह्याचे आपल्याला सदैव भान असले पाहिजे. म्हणजेच आज जे काही नकारात्मक तुमच्याबरोबर घडत आहे त्याने तुमच्या मनाची सारखी चलबिचल होणार नाही आणि तुम्ही सध्या जे काही कार्य करत आहात ते कार्य शांत मनाने सहज करू शकाल.  

ह्या अशा प्रकारच्या अनेक सुंदर आठवणी आहेत ज्या आठवून आपण कुठल्याही नकारात्मक परिस्थितीतून स्वतःला वेगळे करू शकतो आणि काही क्षणात स्वतःला ताजेतवाने करू शकतो. 

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या