तणावमुक्त राहण्यासाठी या गोष्टी करा

तणावमुक्त राहण्यासाठी या गोष्टी करा

हल्लीच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीत ऑफिसमधून घरी येताच बऱ्याच लोकांना थकल्यासारखे वाटते, कधी कधी ऑफिसच्या कामामुळे चीडचीड होते, राग येतो. 
अनेकदा असेही होते की  ऑफिसमधील टेन्शन्स घरात व्यक्त केले जाते. त्यामुळे साहजिकच घरातील वातावरणही काहीसे बिघडते आणि त्याचा परिणाम नात्यांवर होतो. त्यामुळे हल्ली बऱ्याच लोकांची मनःशांती दुर्मिळ झाली आहे. 
माणूस म्हटलं की समस्या, टेन्शन्स या गोष्टी ओघाने आल्याच. कामाचा किंवा घरचा ताण आणि त्यामुळे होणारा मनस्ताप या गोष्टी अटळ असल्या तरी या तणावाचा चुकीचा परिणाम आपल्यावरच होत असतो. त्यामुळे तुम्ही स्वत:ला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याची गरज असते. पण जाणीवपूर्वक जर दिवसाची सुरुवात काही खास गोष्टी करुन केल्यास ही चीडचीड, राग दूर होण्यास मदतच होईल.


खान-पान, संयमित व्यवहार करणे, पथ्य-अपथ्य (जे प्रकृतीला अनुरूप आहेत) व्यवस्थित दिनचर्या, ऋतुचर्या, आणि तणावमुक्त राहून मानसिक स्वरूपाने स्वस्थ राहणे काही छोट्या गोष्टीना आपण जीवनात आत्मसात केले पाहिजे. तर जाणून घेऊया दिवस चांगला आणि तणावमूक्त जाण्यासाठी दिवसाची सुरुवात नेमकी कशी करावी...

१) जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या घरच्यांसोबत, प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांच्याशी बोला. गरज असल्यास त्यांना आवश्यक मदत करा. तुम्हाला समाधान मिळेल.
 Happy family spending time together
२) घरात ताजी हवा येऊ देण्यासाठी सकाळी उठल्यावर घराच्या खिडक्या उघडा. ताजी, शुद्ध हवा घरामध्ये येऊ द्या. कोवळा सुर्यप्रकाश आत आल्याने तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. 

३) तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट सतत घोळत असेल किंवा एखादी चिंता तुम्हाला सतावत असेल, तर त्याविषयी आपल्या जवळच्या हक्काच्या व्यक्तीबरोबर बोला. बोलल्याने तुमचं मन हलकं होईल. कदाचित समोरच्या व्यक्तीकडून तुमच्या समस्येवर उपाय मिळून जाईल.
 Mature grandmother and granddaughter eating ice-cream sitting on a bench
४) रोज व्यायाम करा कारण व्यायामामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर फ्रेश, टवटवीत, आनंदी वाटते. सकाळी ३० मिनिटे व्यायाम केल्यामुळे शारिरीक-मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
 Treadmill workout.
५) एखादी व्यक्ती सतत तुमच्या मनात नकारात्मक गोष्टी भरवत असेल, तुमच्याशी सतत निराशजनक पद्धतीने बोलत असेल तर अशा व्यक्तींपासून स्वतःला नेहमी जाणीवपूर्वक दूर ठेवा. सकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींसोबत वेळ घालवा.
Business coach.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या