वेळेचा सदुपयोग करा आणि यशस्वी आयुष्य जगा

वेळेचा सदुपयोग करा आणि यशस्वी आयुष्य जगा


बहुतांश लोकांची तक्रार असते की "आम्हाला वेळ मिळत नाही", "संपूर्ण दिवस कामाच्या रगाड्यात कसा निघून जातो ते कळतच नाही ", "खूप काही करायची इच्छा असते पण वेळच मिळत नाही ". अशी विविध विधाने थोड्याफार फरकाने बरेच लोकं करत असतात. आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्व आहे. 
कुठलीही गोष्ट वेळेवर केल्यास आपल्यालाच त्याचा फायदा होतो. खरं पाहता आपल्या सर्वांनाच दिवसातील २४ तास हा सारखाच वेळ मिळतो, तरी बरेच लोकं वेळ मिळत नाही, पुरत नाही म्हणून तक्रार करताना आढळतात. आपल्याला सर्वांना मिळालेला हा २४ तासांचा सारखाच वेळ आपण कशाप्रकारे वापरतो हे इथे खूप महत्वपूर्ण ठरतं. वेळेप्रमाणे आपण आपली कामं योग्य प्रकारे हाताळणे ही एक कला आहे.


आपल्या कामाप्रमाणे आपले दिवसभराचे वेळापत्रक बनवून त्याचा नियमितपणे वापर केल्यास आपली कामं आपल्याला वेळेवर व चोखपणे पूर्ण करायला त्याची नक्कीच मदत होईल. 
सुरवातीला वेळापत्रक पाळणे थोडे कठीण होईल, 

पण हळूहळू त्याची आपल्याला सवय होईल. एकदा का वेळेवर काम करण्याची चांगली सवय जडल्यास आपल्यालाच आपल्या कामातील चांगला फरक अनुभवता येईल. आपल्याला वेळ पुरत नाही अशी तक्रार हळूहळू कमी होईल. वेळेवर काम झाल्याने आपल्या आयुष्यात चांगला व सकारात्मक  बदल घडायला सुरवात होईल. 

वेळेच्या योग्य सदुपयोगाने आपल्याला आपली ध्येय गाठायला मदतच होईल. कुठलीही गोष्ट योग्य वेळेवर केल्याने आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता येईल. आपल्या वैयक्तिक व व्यायसायिक जबाबदारीमध्ये योग्य समतोल राखण्यास मदत होईल. थोडक्यात काय तर वेळेचं योग्य भान पाळल्यास आपण आपलं आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो.


कामाच्या रगाड्यात न अडकता योग्य वेळापत्रकाच्या मदतीने आपण आपली कामं वेळेवर पार पाडून आपल्या वेळेचा नक्कीच सदुपयोग करू शकतो.
Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या