नेहमी सकारात्मक राहायचे असेल तर काय कराल

लहानपणी शाळेत जायला लागल्यावर आपण लिहायला आणि वाचायला शिकलो. प्रथम लिहायला शिकलो की वाचायला हे सांगणं तसं अवघड आहे कारण ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. वाचन हे आपल्या व्यक्तिगत विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. योग्य व सकारात्मक वाचनाने आपण आपल्या आयुष्याला योग्य कलाटणी देऊ शकतो. आपण जे ऐकतो, वाचतो, व बघतो तसेच आपण विचार करतो व तसेच आपले व्यक्तिमत्व बनते.


त्यामुळे आपण काय ऐकतो, वाचतो किंवा बघतो हे खूप महत्वाचे आहे.


ह्यातील ऐकण्यावर आणि बघण्यावर आपण कदाचित ताबा नाही ठेवू शकत, कारण खूपवेळा ते सभोवतालच्या परिस्थितीवरही अवलंबून असते.

पण आपण काय वाचावं हे मात्र नक्कीच ठरवू शकतो. आपण नेहमी योग्य व सकारात्मक वाचन केल्यास आपल्या मनाला सकारात्मक विचारांचं वळण लावायला नक्कीच मदत होईल. आपल्या मेंदूला योग्य व सकारात्मक विचारांचं खाद्य पुरवल्याने कुठल्याही परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो.


कुठल्याही समस्येत अडकून न पडता समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर समाधान शोधु शकतो.

नियमितपणे साधारण १०-१५ मिनिटे तरी पुस्तक वाचायची सवय आपण लावली पाहिजे. आपल्याकडे पुरातन काळापासून विविध विषयांवर वाङ्मय उपलब्ध आहे. सकारात्मक, व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, मन, ध्येय, इद्यादी विविध विषयांवर आज पुस्तकं उपलब्ध आहेत. आपल्याला उपयुक्त असणारी किंवा ध्येय गाठण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी असलेली पुस्तकं जरूर आपल्या वाचनात ठेवावीत. 

सध्याच्या काळात पुस्तकांबरोबरच आपल्या स्मार्ट फोनवर विविध प्रकारचे App असतात किंवा ब्लॉग असतात तेही आपण वाचू शकतो. ह्याचा अर्थ आपण आपल्याला वाचनासाठी वेळ मिळत नाही अशी सबब देखील देऊ शकत नाही. तसेच आपण दिवसभरात कधीही कुठेही योग्य व सकारात्मक वाचन करून आपल्या मेंदूला चालना देऊ शकतो.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या