मंगळवार, १० जुलै, २०१८

नेहमी कारणांमध्ये न अडकता ती सोडवण्यावर भर द्या

नेहमी कारणांमध्ये न अडकता ती सोडवण्यावर भर द्या

माणसाला मिळालेली अमूल्य देणगी म्हणजे त्याची बुद्धी व 

कल्पकता.

आपल्या कल्पकतेचा व बुद्धीचा वापर करून आजतायागत माणसाने भरपूर शोध लावले, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन तंत्र विकसित केले.


जगातील प्रत्येक माणूस हा अव्दितीय आहे. पण जर आपण नीट निरीक्षण केले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या बुद्धीचा व कौशल्याचा योग्य वापर करताना दिसत नाही. 
काही मोजकीच लोकं कुठलेही कारण न देता आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरी जाऊन स्वतःकडे असलेल्या कौशल्याचा योग्य वापर करून यशस्वी होताना दिसतात.


तेच बहुतेक जण विविध कारणांमध्ये अडकलेले दिसतात. उदा. वेळ नाही, पैसे नाही, चांगली नोकरी नाही, कामासाठी चांगली माणसे मिळत नाहीत, घरातले समजून घेत नाहीत, मुले ऐकत नाहीत, इत्यादी. अशी अनेक लोकं आहेत अशांकडे काय नाही आहे याची संपूर्ण यादीच तयार असते.

आपण किती दु:खी आहोत बाकीचे सगळे किती सुखी आहेत ह्या विचारांमध्ये ते रममाण असतात. पण खरं पाहता आपल्याकडे काय नाही आहे हे न पाहता आपल्याकडे काय आहे ह्याचा कुणी फारसा विचार करताना दिसत नाही. ह्या जगात कमी अधिक फरकाने प्रत्येकालाच काहीना काही समस्या व दु:ख असतात. पण त्या समस्येमध्ये किंवा दु:खामध्ये न अडकता आपल्या मनातील आत्मविश्वासाने आपण कुठल्याही परिस्थितीला सामोरे गेलो असता आपण आपल्याला हवी असलेली ध्येय नक्कीच गाठू शकतो.

कुठल्याही सबबी न देता आपल्यातील बुद्धीचा व कल्पकतेचा योग्य वापर करून आपण आपली सध्याची परिस्थिती नक्की बदलू शकतो. ह्यासाठी आपल्याला आपल्या मनाला योग्य व सकारात्मक विचारांचं खाद्य नियमित पुरवले पाहिजे. 

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर कामात आणि प्रवासात वेळ घालवल्यामुळे आजकाल आपल्याला स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला फारसा वेळच मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. वजनवाढीमुळे आणि सततच्या कामांमुळे आपल्या आरोग्यावर कालांतराने विपरीत परिणाम होऊ शकतो परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...