स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टी नीट लक्षात ठेवा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टी नीट लक्षात ठेवा

मोबाईलच्या म्हणा किंवा आजच्या सोयी सुविधांच्या वस्तू म्हणा यामुळे अनेकांना स्मरणशक्ती कमी झाल्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासोबतच स्मरणशक्तीसाठी आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्याने स्मरणशक्ती कमी होत आहे.

 

ह्याचे प्रमुख कारण आजची बदललेली जीवनशैली आहे. ह्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या आहारात महत्वाचे बदल जाणीवपूर्वक केले पाहिजेत आणि आपल्या मुलांनाही त्याची नीट सवय लावली पाहिजे कारण स्मरणशक्ती ही सर्वात जास्त प्रमाणात पहिल्या ७ वर्षांमध्ये विकसित होत असते.  म्हणून स्मरणशक्ती वाढवायची असेल तर खालील पदार्थ कमी खाणे जास्त फायद्याचे ठरेल. 

१) सीफूड्स
तज्ञांच्या एका अहवालातून असे समोर आले आहे की  सीफूड्समध्ये मर्करीचं प्रमाण अधिक असतं आणि  जे लोकं आठवड्यातून तीनपेक्षा जास्त वेळा मासे खातात त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण अधिक होऊ शकते.

२) गोड पदार्थ
एका रिसर्चनुसार, खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यास कालांतराने तुमच्या स्मरणशक्तीवरही प्रभाव पडतो. जास्त गोड खाल्ल्याने अभ्यासात किंवा लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते.

३) ट्रान्स फॅट
एका संशोधनातून असे पुढे आले की बऱ्याचदा ट्रान्स फॅटचा वापर डुप्लिकेट दही तयार करण्यासाठी, स्नॅक्स फूड आणि बेक्ड फूडमध्ये केला जातो. त्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचा कालांतराने वाईट परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे केंव्हाही अशा पदार्थांसाठी आपण नेहमीच त्या ब्रँडचे लेबल नीट तपासून पाहावे.


४) चटपटीत पदार्थ
एका रिसर्चनुसार, चटपटीत पदार्थांमुळे हृदयाच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये समस्या येऊ शकते. त्यासोबतच यातील सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे आपल्या स्मरणशक्तीवरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

५) सॅच्युरेटेड फॅट
तज्ञांच्या म्हणण्यानुसार  अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्याने त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर प्रभाव पडतो. त्यामुळे पिझ्झा आणि पास्तासारखे पदार्थ कमी प्रमाणात किंवा जमल्यास खाऊ नयेत, त्याऐवजी फळे, ड्रायफ्रूट्स किंवा इतर पौष्टिक आहार घ्यावा.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर बसून काम करण्यामुळे वजन वाढीच्या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. पोटाचा घेर वाढल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या