व्यायामानंतर केलेल्या या चूकांमुळे वजन कमी होत नाही!

व्यायामानंतर केलेल्या या चूकांमुळे वजन कमी होत नाही!

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक आरोग्य चांगले राखणे आवश्यक झाले आहे आणि त्यातच हल्ली बऱ्याच लोकांना ह्याचे महत्व पटलेले आहे
Healthy lifestyle concept, Diet and fitness, Fitness female holding snack and dumbbell in other hand Free Photo

पण ह्यात बऱ्याच लोकांना   आठवड्यातून साधारण  किंवा दिवस नित्यनियमाने व्यायाम करूनसुद्धा हवा तसा परिणाम दिसून येत नाही आणि मग व्यायामासाठी खर्ची केलेल्या वेळाबद्दल कालांतराने नकारत्मक भावना निर्माण व्हायला लागते. पण जर वजन का कमी होत नाही ह्याचे जर कारण पहिले तर ते अगदी सोप्पे आहे आणि ते म्हणजे तुम्ही व्यायमानंतर लगेचच काय खाता त्यामध्ये ह्याचे मूळ कारण दडलेले आहे. कारण वजन कमी होण्यास तुम्ही व्यायामानंतर काय खाता त्यावर अवलंबून असते. तर आता आपण हे जाणून घेऊया की व्यायामानंतर काय खाणे योग्य ठरेल...?योग्य प्रमाणात खाणे:

सर्वात प्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की वजन कमी करताना तुम्ही किती व्यायाम करता यापेक्षा तुम्ही किती खाता, काय खाता याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची कायम जाणीव ठेवा की व्यायामानंतर योग्य ते अन्नपदार्थ योग्य प्रमाणात खाणे अत्यंत गरजेचे आहे.

कार्ब्स योग्य प्रमाणात घेणे:
कोणताही व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीराला आणि स्नायूंना अधिक प्रमाणात ग्लुकोजची गरज भासते. अशा वेळेस जर आपण धान्य, डाळी, फळे आणि भाज्या यातून आपल्या शरीराची ग्लुकोजची गरज योग्य प्रमाणात भागवू शकतो.
Healthy lifestyle concept, Diet and fitness, Fitness female holding glass of milk and egg with copy space Free Photoयोग्य प्रमाणात प्रोटीन्स घेणे:

जर आपल्याला व्यायामाचे फायदे अधिक प्रमाणात करून घ्यायचे असतील तर व्यायामानंतर योग्य प्रमाणात प्रोटीन्स घेणे गरजेचे आहे, कारण प्रोटीन्स आपल्या शरीराच्या संपूर्ण विकासासाठी खूप उपयुक्त असते. प्रोटीन्स घेताना शक्यतो आपण एक्स्पर्ट व्यक्तींचा सल्ला घेतलात तर ते जास्त योग्य ठरेल.

योग्य प्रमाणात पाणी पिणे:

पाणी आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. आपल्या शरीराचा ७२% हिस्सा पाण्याने व्यापलेला आहे हे तर आपण सर्वच जाणतो. जेंव्हा आपण व्यायाम करतो तेंव्हा घामावाटे आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडते आणि साहजिकच आपल्याला थोड्या प्रमाणात डिहायड्रेशन जाणवते. म्हणून व्यायामानंतर पुरेसे पाणी प्या तसेच दिवसभरात देखील कमीतकमी २ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.ह्या आणि अशा साध्या गोष्टींचा आपण जर नीट विचार केला तर आपण आपले वाढलेले वजन सहजपणे आटोक्यात आणू शकतो. आजकालच्या जीवशैलीमध्ये बरेच जण व्यायाम करायला कंटाळा करतात पण जर इथे तुम्ही नीट पाहिलेत तर व्यायाम हा तुम्ही स्वतःसाठी करणार आहात आणि स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्याची पूर्ण जबाबदारी ही आपली स्वतःचीच आहे. 
Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकातून लेखकांनी ह्याच गोष्टींचा उलगडा केलेला आहे. व्यायाम करण्यासाठी आपण आपली आजकालच्या धावपळीतून कशा प्रकारे मानसिकता तयार करू शकतो आणि आपल्या रोजच्या जीवनात कशा प्रकारे एक नवीन बदल आणू शकतो हे त्यांनी ह्या पुस्तकात उलगडून दाखवलेले आहे. 


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: 

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या