अनेक प्रयत्न करुनही वजन कमी न होण्याची ही आहेत कारणं!

अनेक प्रयत्न करुनही वजन कमी न होण्याची ही आहेत कारणं!

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि सतत बसून काम करण्यामुळे अनेकजण हे वाढत्या पोटामुळे हैराण झालेले आहेत. 

पोट कमी करण्यासाठी अनेक लोकं वेगवेगळे उपाय करताना आपल्या नजरेस पडत असतात. पण बऱ्याचवेळा अनेक प्रयत्न करुनही पोट काही कमी होत नाही आणि हेच वाढलेले पोट अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देते.
पण प्रयत्न करुनही तुमचं वाढलेलं पोट कमी होत नसेल तर तुम्ही  ह्याचा नीट विचार करायला हवा. तर आपण पोटावरील चरबी कमी न होण्याची करणे जाणून घेऊयात ....


१) अल्कोहोलचं सेवन अधिक प्रमाणात केल्याने वजन वाढते तसेच त्यामुळे कॅलरी अधिक वाढतात. प्राप्त माहितीनुसार 12 आउंस बीअरमध्ये 153 कॅलरी असतात तसेच त्याबरोबर खाणेही होते, त्यामुळे साहजिकच अल्कोहोल वजन वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. त्यासाठी अल्कोहोलचं सेवन जाणीवपूर्वक न केलेलेच बरे.


२) काही लोकांच्या शरीराच्या विशिष्ट रचनेमुळे त्यांच्या मांड्यासह त्यांचा जाडेपणा त्यांच्या पोटावरही दिसतो. ह्यालाच अॅप्पल शेप बॉडी असे म्हणतात. अशा रचना असलेल्या लोकांनी योग्य मार्गदर्शन घेतले तर त्यांचे वजन आणि पोट कमी होण्यास नक्की मदत होईल. शरीराची ही अशी रचना बऱ्याचवेळा आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होते.


३) वाढत्या वयासोबत शरीरातील मेटाबोलिक रेट कमी होऊन शरीर योग्यप्रकारे काम करत नाही. तसेच महिलांमध्ये मासिळ पाळी बंद झाल्यानंतर त्यांच्या पोटावरील चरबी वाढणं सुरु होतं. मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरामधील होर्मोन्समध्ये बराच बदल होतो आणि  त्यामुळे महिलांचं वजन वाढतं.

४) आपल्या शरीराला साधारण ६ ते ८ तास झोपेची आवशक्यता असते पण तज्ञांच्या अभ्यासातून असे समोर आलं आहे की, जे लोक पाच तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्या लोकांचं वजन वाढण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते.

५) आपल्या दिवसभराच्या खाण्यात व्हाईट ब्रेड, चिप्स, मिठाई, फास्टफूड, कोल्ड ड्रिंकमुळे व्यायाम केला तरी पोटावरील चरबी कमी होत नाही. जर तुम्हाला तुमचं वाढलेलं पोट कमी करायचं असेल तर फळे, भाज्यांचं सेवन जाणीवपूर्वक करायला हवं.

६) काही लोक हे पोट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाईज करतात. पण तरीही उपयोग होत नाही.  ह्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दिवसभरातील तणावपूर्ण जीवनशैली कारण जास्त तणावामुळे स्ट्रेस हार्मोन्स शरीरात जाडेपणा वाढवण्यासोबतच फॅट सेल्सही वाढवतात व परिणामी वजन कमी होत नाही.


Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर बसून काम करण्यामुळे वजन वाढीच्या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. पोटाचा घेर वाढल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या