पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय!

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय!


आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांना वजन वाढीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि ह्यावर मात करण्यासाठी काही लोकं वेगवेगळे उपाय देखील करताना दिसून येत आहेत. 


तसेच काही लोकं तर जेवण करण्याचे देखील सोडून देतात पण खरं कारण हे आहे की वजन कमी करायचे असेल तर आपण दिवसा पोटभर जेवले पाहिजे.

त्यासाठी दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने योग्य प्रमाणात काही खात राहिलात तर वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचबरोबर सलाड किंवा फळांचे सेवन करा ज्यामुळे पोटही कायम भरलेले राहील आणि ज्यादा कॅलरीजची चिंताही राहणार नाही.

ग्रीन टी


हल्ली बरेच लोकं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी चा वापर करताना आढळून येतात कारण ह्यामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण मुबलक असते जे आपल्या शरीरातील चरबी वाढवणाऱ्या सेल्सना कंट्रोल करण्याचे महत्वाचे काम करते. ग्रीन टी सकाळी रिकाम्या पोटी कधीही घेऊ नये. तसेच शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही ग्रीन टी प्यायल्याने वाढते.  

लिंबू पाणी

आपण घेत असलेल्या श्वासामुळे तसेच रोजच्या खाण्यामुळे सतत आपल्या शरीरात विषारी पदार्थ तयार होत असतात ज्यांना आपण टॉक्सिन्स असे म्हणतो, हे नुकसानकारक टॉक्सिन शरीराबाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यामुळे रोज अंदाजे २ लिटर पाणी प्यावे किंवा आपण रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबूचा रस मिश्रित करुनसुद्धा पिऊ शकता. लिंबाने आपली पचनक्रिया चांगली होण्यास भरपूर मदत होते व आपले डायजेशनही चांगलं होते.

बदाम 

ड्रायफ्रूट्स ही खूप पौष्टिक असतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल पण त्यातही बदाम हा पदार्थ जास्त लोकांना आवडणारा आहे आणि ह्या बदामामध्ये व्हिटॅमिन इ, अॅंटीऑक्सीडेंट्स, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशिअम, कॅल्शिअमसारखे भूक कंट्रोल करणारे तत्व असल्याने आपण कायम आपल्याबरोबर काही बदाम ठेवावेत कारण याच्या सेवनाने पोट भरल्यासारखं राहतं आणि भूकही कमी होण्यास मदत होते. वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असणाऱ्या ह्या बदामाचा आपण कायम उपयोग करून घेतला पाहिजे.

दही


दही खाल्ल्यानं शरीरातील अधिक चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते तसेच जर आपण दिवसातून दोन-तीन वेळा ताक प्यायल्यास आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. दह्यामधील प्रोबायोटिक बॅक्टीरियामुळे अन्न पचनास मदत होते आणि त्यामुळे वजनही कंट्रोलमध्ये राहते. म्हणूनच दररोज जेवण करताना दही खाणे चांगले.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर बसून काम करण्यामुळे वजन वाढीच्या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. पोटाचा घेर वाढल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या