पोटाची चरबी कमी करण्यासाठी वापरा हा पदार्थ !

पोटाची चरबी कमी करण्यासाठी वापरा हा पदार्थ !


आपण बऱ्याच वेळेस पाहिले असेल की आजारी माणसाला गव्हाच्या रव्याचा आहार दिला जातो ज्याने त्या माणसाला लवकर बरेदेखील वाटते. 

गव्हाचे पीठ दळून बनवले जाते तसेच ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. वजन कमी करणाऱ्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो.

आता आपण गव्हाचा रवा खाण्याचे फायदे जाणून घेऊयात:
 १)  आपल्या शरीराची पचन शक्ती सुधारण्यासाठी आणि चांगले पोषण होण्यासाठी फायबरची आवशक्यता असते आणि गव्हाच्या रव्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात.आपल्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास हे खूपच उपयुक्त आहेत. त्यामुळे बराच वेळ आपले पोट भरलेले राहते आणि आपल्याकडून इतर खाद्य आपोआपच कमी खाल्ले जाते. त्यामुळे सतत खाण्याची गरज भासत नाही.

 २)  आपल्या शरीराला दिवसभर चांगली ऊर्जा हवी असल्यास गव्हाचा रवा  खूपच फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील मेटाबॉलिजम सिस्टम चांगली राहते. तसेच सकाळच्या वेळेत एक परफेक्ट नाश्ता म्हणूनही आपण याचे नियमित सेवन केले तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.

 ३)  अॅण्टी-ऑक्साइड मुबलक प्रमाणात असलेले पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतात कारण रोजच्यारोज आपल्या शरीरातील अनावश्यक घटक (Toxins) आपल्या शरीरातून रोजच्यारोज बाहेर पडले पाहिजेत. गव्हाच्या रव्यात अॅण्टी-ऑक्साइड मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातून अनावश्यक घटक (Toxins) बाहेर फेकण्यास यामुळे मदत होते.

 ४)   तसेच ह्यामध्ये खूप कमी कॅलरीज असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही नाश्त्याला हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीराला उर्जा तर मिळतेच पण यामुळे वजनसुद्धा आटोक्यात राहते. तसेच याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. दिवसभर बसून काम करण्यामुळे वजन वाढीच्या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. पोटाचा घेर वाढल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात परंतु ह्या पुस्तकात त्यावर मात करण्याचे सोपे उपाय लेखकांनी साध्या भाषेत समजावले आहे.खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या