सतत एसी-कुलरची हवा खाणे त्रासदायक ठरू शकते

सतत एसी-कुलरची हवा खाणे त्रासदायक ठरू शकते

काही वर्षांपूर्वी काही ठराविक ठिकाणी नजरेस पडणारी वातानुकूलित यंत्रे हल्ली आपल्याला सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. हल्ली प्रत्येक घरातदेखील एसी असतो. 


अशा वेळेस कुठलाही ऋतू असो काही लोकांना सतत एसीमध्ये राहण्याची सवय लागून गेलेली असते. घर, ऑफिस, कार अशा प्रत्येक ठिकाणी काही लोकं एसीमध्येच असतात. अशा लोकांना एसीशिवाय राहणं जमत नाही. पण ही अशी सवय कालांतराने आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पाडू शकते. हल्ली गरमीच्या दिवसात एसी किंवा कुलरचा वापर पूर्णपणे बंद करणे जरी शक्य नसले तरी त्याचा वापर हा जाणीवपूर्वक नक्की कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. तर आपण येथे जाणून घेऊयात की एसी-कुलरचा जास्त वापर आपल्या आरोग्यावर काय परिणाम करू शकतो.

सतत आजारी पडणे:
संशोधकांच्या एका अहवालानुसार सतत एसीमध्ये राहिल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतात, कारण आपल्या सर्वांनाच माहित असेल की एसी आपल्या आजूबाजूला एक आर्टीफिशिअल टेम्परेचर तयार करते ज्यामुळे आपल्या शरीराची कालांतराने रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि मग ती व्यक्ती सतत आजारी पडू लागते. जे लोक रोज एसीमध्ये 4 तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात अशांना सायनस होण्याची शक्यता असते.

वजन वाढणे:
हल्लीच्या दिवसात जवळजवळ सगळीच कामे बसून केली जातात आणि त्यातच जर आपण जास्तवेळ एसी किंवा कुलर समोर बसून राहिलो तर कालांतराने शरीरावर जाडपण येते. ह्याचे मूळ कारण हे आहे की कायम थंड वातावरणामुळे शरीरातील ऊर्जा खर्ची होत नाही. त्यामुळे शरीरातील चरबी वाढत जाते. ह्याचा आणखीन एक दुष्परिणाम म्हणजे सतत एसी असलेल्या ठिकाणी काम केल्याने कालांतराने मांसपेशी आकुंचन पावतात.

स्किन ड्राय होणे:
आपल्याला कितीही चांगले वाटले तरी सतत एसी किंवा कुलरच्या हवेत बसल्याने स्किन ड्राय होण्याचे प्रमाण हल्लीच्या लोकांमध्ये भरपूर वाढलेले दिसून येते.

सांधेदुखी-अंगदुखीचा वारंवार त्रास होणे:

एसी आणि कूलरच्या थंड हवेमुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होऊन कालांतराने संपूर्ण शरीराला वेदना होतात. जर ह्या दुखण्याकडे वेळीच लक्ष्य दिले नाही तर त्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. 
दिवसभर बसून काम करण्यामुळे वजन वाढीच्या समस्यांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्की मदत करेल. ह्या पुस्तकात लेखकांनी त्यांच्या वजनवाढीच्या समस्येवर कशा प्रकारे मात केली ते सविस्तरपणे मांडले आहे जे तुम्हालाही तुमच्या रोजच्या जीवनात कामी येऊ शकते.खालील लिंकवर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मिळवू 

शकता: 

 आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या