अतिविचाराने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात

अतिविचाराने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात:

जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्याही बाबतीत अतिविचार किंवा चिंता केली तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Man followed by ideas
आत्ताच्या काळात आपण प्रत्येक क्षणी प्रगतीपथाकडे मार्गक्रमण करत आहोत. त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात आपल्यामध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. 
ह्यामध्ये स्पर्धेमध्ये प्रत्येकाला कमी वेळात यशस्वी व्हायचे आहे, आणि ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकजण अनेक अडचणींना सामोरे जात आपापल्या क्षेत्रात प्रयत्न करत आहे.


ह्या अशा गोष्टींमुळे बऱ्याच लोकांमध्ये एखाद्या गोष्टीचा अधिक विचार करण्याची सवय बळावत आहे आणि ही अधिक विचार करण्याची सवय आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत आहे. घर-परिवार, नोकरी किंवा कोणत्याही मुद्दयावर गरजेपेक्षा अधिक विचार करणे आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते असे तज्ञांचे देखील म्हणणे आहे. तसेच त्यांच्या अभ्यासातून असेही लक्षात आले आहे की अतिविचार किंवा चिंता यामुळे समस्या कमी न होता त्याचा आपल्या शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो आणि त्याने आपल्यामध्ये अधिक आजारपण वाढू शकते. 

म्हणूनच आपण कोणत्याही गोष्टींचा प्रमाणातच विचार करावा जेणेकरून त्याचा आपल्याला भविष्यात त्रास होणार नाही.

# अतिविचाराचा परिणाम आपल्या कामावरही होऊ शकतो. ह्याचा प्रत्यय बहुतेकांना आपल्या आयुष्यात आलेलाच असेल.

# अधिक विचार केल्याने तणाव, चिंता, मुड स्विंग्स यांसारख्या मानसिक समस्या उद्भवून त्याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होऊ शकतो ज्यामुळे आपल्याला पोटात जळजळ होण्याचे किंवा अपचनाचे विकार होऊ शकतात.

# तज्ञांचे नेहमीच म्हणणे असते की अतिविचार किंवा चिंता याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊन  अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे छातीत दुखणे, चक्कर येणे, निद्रानाश यांसारख्या समस्या वाढतातच पण अतिविचारांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवरही होतो.

# अधिक विचार आणि चिंतेमुळे भावनात्मक तणाव वाढण्याची शक्यता अधिक बळावते.

# अतिविचाराने आपल्या मेंदूवर परिणाम होऊन शरीराची काम करण्याची क्षमता कमी होऊन पचनक्रियेच्या समस्या, ब्लड प्रेशर, हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. आपण आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचा विचार प्रथम केला पाहिजे. नकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेवून आपण आपल्या कामावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. आपल्या समोर ज्या काही अडचणी येतील त्यावर आपण सकारत्मक विचारांनी मात केली पाहिजे आणि त्या क्षणी ती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून पुढे गेले पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणायला नक्की उपयुक्त ठरेल.

खालील लिंकवर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मिळवू 

शकता: 

 आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या