सतत प्रयत्न करा

सतत प्रयत्न करा :

या जगात अशाच व्यक्तीला यश मिळते जो ते मिळवण्यासाठी आपली योग्यता वाढवतो.
Scene of businessmen working hard Free Vector

सतत प्रयत्न करा :

परमेश्वर आपल्याला छप्पर फाडून सर्व काही देईल किंवा एक दिवस आपली लॉटरी लागेल अशा विचारात न राहता आपण नेहमी आपल्या योग्य ध्येयासाठी मेहनत घेतली पाहिजे.


तुम्ही जर मनातून अपयशाचा स्वीकार केलात तर तुमच्या वाट्याला अपयशच येईल. कारण बऱ्याच जणांना मनात आपण यशस्वी होऊ हे कमी आणि अयशस्वी होऊ ह्याचे विचार जास्त येतात. पण खरे पाहता आपल्याला आहे त्या परिस्थितीतून वर येण्यासाठी स्वतःच मेहनत घ्यावी लागेल, आणि हे जेंव्हा आपल्याला मनापासून पटेल तेंव्हाच आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. 

कदाचित काही लोकांना आश्चर्य वाटेल पण आपल्या मनातले अपयशाचे विचार आपण कळत नकळत आपल्या मुलांवर आणि आजूबाजूच्या लोकांवरही लादत असतो आणि असे विचार जर लहानपणापासून झाले तर अशा मुलांना मोठेपणी कठीण परिस्थितीला सामोरे जाताना अडथळे निर्माण करू शकतो. म्हणून सकारात्मक विचारांची मुळे रुजवण्याचे महत्वाचे काम आपण आपल्या लहान मुलांपासूनच करावेत.

आपल्या आयुष्यात अपयशाचे मुख्य कारण भीती आणि शंकाग्रस्त मन हेच असते. जर मन अशा विचारांनी भरून गेले तर त्या माणसाची स्थिती सुधारण्याची शक्यता कमी होऊन जाते. मग अपयशाचे अनेक प्रसंग अशा माणसाच्या वाट्याला सतत येत राहतात. अनेकदा आपल्या भोवतीचे वातावरण आणि परिस्थिती ही नकारात्मक असते. अनेक जण असे आहेत त्यांच्यात प्रचंड क्षमता आणि बुद्धिमत्ता असूनही वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात वाव मिळत नाही. अशा वेळेस आपण जर आपली योग्यता आपल्या कुटुंबीयांसमोर योग्य पद्धतीने मांडली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो पण येथे कुटुंबातील सदस्यांनीही आपल्या व्यक्तीला मोठ्या मनाने समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे.

आशा प्रकारे जर आपण सतत चांगल्या विचारांच्या आणि गोष्टींच्या प्रयत्नात राहिलो तर यश मिळवणे सोपे होऊन जाईल.

Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर भाष्य केले आहे. जर आपल्याला आपल्या जिवंत एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर तर आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. असे प्रयत्न करताना आपल्या समोर ज्या काही अडचणी येतील त्यावर आपण सकारत्मक विचारांनी मात केली पाहिजे आणि त्या क्षणी ती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून पुढे गेले पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणायला नक्की उपयुक्त ठरेल.खालील लिंकवर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मिळवू 

शकता: 

⇒⇒ Livewell: Lead Meaningful Life


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या