वीस मिनिटांचा व्यायाम पुरेसा…

वीस मिनिटांचा व्यायाम पुरेसा…

मानसिक ताण वाढल्यामुळे व शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते आहे.
Back view woman exercising with dumbbells Free Photo


शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. मूड प्रत्येक वेळेस बदलणे, वजनात फरक पडणे, पचनशक्ती, पचनक्रिया बिघडणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, अंतर्गत कार्य बिघडणे.
या सर्वांवर परिणाम दिसून येतो. एक नियमित व्यायाम या सर्व व्याधी दूर ठेऊ शकतो. यासाठी 20 मिनिटांचा व्यायामही पुरेसा ठरतो.

नियमित व्यायामामुळे शरीर निरोगी राहते व बसून केलेल्या कामापासून सुटकाही होते. आरोग्य म्हणजे शारीरिक व मानसिक आजार नसणे. आजकाल रोजच्या व्यवहारातील शारीरिक कामे ही आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी झाली आहे. त्याची जागा मानसिक आजाराने घेतली आहे.नियम
20 मिनिटांचा व्यायाम अशांनीच करावा ज्यांना जिमला, ग्रुप 
ट्रेकिंगला जाण्यास अजिबात वेळ नाही.
20 मि. व्यायाम हा पूर्ण सहाही दिवस करावा.
20 मिनिटांमध्ये कमीत-कमी 360 कॅलरीज खर्च होतील याकडे लक्ष द्यावे.
व्यक्तीला पूर्ण शरीराचा व्यायामाने सुरुवात करावी.
वॉर्मअप व कुलडाऊन चुकवू नये.
जसे वय वाढते तसे घाम येण्याचे प्रमाण कमी होत जाते म्हणून वृद्ध लोकांना गरम लवकर होते. जर तुम्ही एअर कंडीशन खोलीमध्ये व्यायाम करत असाल किंवा थंडीच्या दिवसात व्यायाम करत असाल तर तुम्हाला दोन्हींचा फायदा सारखेच मिळतील. तुम्हाला घाम येणार नाही. कारण थंड हवेत घामाचे बाष्पीभवन लवकर थंड होते व त्यामुळे तुम्ही जास्त काळ चांगल्या पद्धतीने व्यायाम होऊ शकता.
याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला घाम आला तरच चांगला व्यायाम झाला किंवा घाम आला तरच जास्त उष्मांक खर्च होऊन वजन लवकर कमी होईल असे नाही. उन्हाळ्यात वजनात जास्त फरक दिसतो कारण त्यावेळेस घामावाटे पाण्याचेही प्रमाण कमी होते. पण शरीरातील पाणी कमी होणे योग्य नाही. उष्मांक हे तुम्ही काय इंटेंसिटीने व किती काळ व्यायाम करता यावर अवलंबून असते घामावर नाही.
असे जर खरे असते की जास्त घाम आला तर जास्त उष्मांक जळतात तर तुम्ही गरम खोलीत बसून घाम गाळू शकता पण त्याने वजन नक्कीच कमी होणार नाही.
व्यायामामुळे उष्णता निर्माण होते, त्यामुळे उष्मांक खर्च होतात आणि तुम्ही तेव्हाच वजन कमी करू शकता. त्यामुळे एअर कंडीशन रूममध्ये व्यायाम केला व घाम आला नाही तरी तुमचा चांगला व्यायाम होईल व त्याचे फायदेही मिळतील.


Crop woman with towel in gym Free Photo 

व्यायाम कसा करावा?
मान : मान हळू-हळू वर खाली हलवावी, हनुवटी पूर्ण खाली व मागे न्यावी. – 10-12 मि., मान अर्धवर्तुळाकार मागे फिरवावी, मान अर्ध वर्तुळाकार पुढे फिरवावी, (मान पूर्ण गोल फिरवू नये)

खांदा : दोन्ही हातांची बोटे जुळवून नि खांद्यावर ठेवावी व कोपरे एकाला एक समोर जुळतील असे पुढून मागे गोलाकार फिरवावे तसेच मागून पुढे असा मोठ्ठा गोल करावा.

कंबर : दोन्ही हात कंबरेवर ठेवून कंबर उजवीकडून डावीकडे फिरवावी तसेच डवीकडून उजवीकडे फिरवावी 10-12 मि. पाय
दोन्ही पायांमध्ये खांद्या एवढे अंतर ठेवून उजवा हात व डावा पाय एका वेळेस वर उचलुन एकमेकांना टेकवावी. 10-12 मि.

श्‍वास – गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध श्‍वास घ्यावा, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने श्‍वास सोडावा.


सदर लेखामध्ये मनाली कदम ( http://www.dainikprabhat.com/ ) ह्यांनी हे अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. ह्याचे कारणही तसेच आहे, आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आज बरेच जण तासंतास सोशल मीडियावर वेळ घालवताना दिसून येतात पण हेच लोक स्वतःच्या आरोग्यासाठी मात्र २० मिनिटे सुद्धा काढू शकत नाही ही एक आरोग्याविषयी मोठी समस्या आयुष्यात निर्माण करू शकते. मनाली कदम ह्यांचे हेच म्हणणे आहे की आपण हा वेळ केवळ आपल्यासाठी काढायचा आहे. Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी ह्याच गोष्टींवर नेमके बोट ठेवले आहे, कारण हल्ली लोकं मला वेळ मिळत नाही असे सहज बोलून दाखवतात पण ह्यातील बरेच लोकं इतर गोष्टींमध्ये दिवसभर विनाकारण वेळ घालवताना आढळून येतात. पण जर आपण मनाशी पक्का निर्धार केला आणि एक पाऊल ह्या
दिशेने उचलले तर नक्की आपण आपल्या आयुष्यात एक नवीन बदल घडवून आणू शकतो. 
Livewell: Lead Meaningful Life  हे पुस्तक ह्याच बदलाविषयी नेमके भाष्य करते.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू 

शकता: [ संबंधित लेख  : https://bit.ly/2LCvCYE]

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


५) व्यायाम न करता कशी कमी कराल पोटावरची चरबी?


Disclaimer 
I do not intend to violet infringe the rights of the author/publisher of this article/book or copyright or any other rights by publishing the excerpt from their original work. This paragraph is taken from the respective published material only with the view to inspired or motivate our readers. We expressed our sincere thanks to author/publisher for their support. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या