जाणून घ्या, सायकलिंगचे फायदे…

जाणून घ्या, सायकलिंगचे फायदे…

सायकलिंगचे शारीरिक आरोग्यासाठी भरपूर फायदे होतात. 
contour bicycle cyclist tour sport Free Photo 
सायकलची ओळख ही सर्वांना 19 व्या शतकात झाली. 1880 मध्ये रॉयल मेलया ब्रिटीश माणसाने पहिली सायकल चालविण्यास सुरुवात केली. इतर खेळांसारखा हा ही एक खेळ प्रकार आहे ज्यात जास्त कौशल्याची गरज नाही.
शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आजार कमी होण्यास मदत होते.

सायकलिंगचे फायदे
सोपा व्यायाम- सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते. या व्यायामासाठी जास्त खर्चही येत नाही. सर्व खेळाडूंसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे.
शारीरिक फायदे
दुखापत कमी होते. सायकलिंग ही एरोबिक व्यायाम प्रकार आहे. ज्या मध्ये कमीत कमी ताण पडतो व दुखापत कमी होते.
मांसपेशींना आकार प्राप्त होतो. शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशींचा ग्रुप वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
वजनावर नियंत्रण राहते- सायकल चालवण्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते, मांसपेशींना आकार येतो, चरबीचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून 3 दिवस सायकलिंग जरूर करावे. एका तासात 500 ते 800 उष्मांक सायकलिंगमुळे खर्च होतात.
हृदयविकार- हृदय विकारामध्ये हृदयाचा झटका,उच्च रक्‍तदाब व स्ट्रोक असे विकार होतात. नियमित सायकल चालविण्याने हृदय फुफ्फुसे व रक्‍त प्रवाह सुधारतो व हृदय विकाराचे प्रमाण कमी होते. हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते. रक्‍तातील चरबीचे प्रमाण कमी होते. एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
Happy family of three cycling on street road Free Photo

कर्करोग आणि सायकलिंग- संशोधात असे लक्षात आले की, सायकलिंगमुळे कर्करोगावर फायदा झाला आहे. विशेषत: आतड्याचा किंवा स्तनाचा कर्करोग सायकलिंगने टाळता येऊ शकतो.
मधुमेह– मधुमेह प्रकार 2 चे प्रमाण लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.(बाहेरुन इन्सुलिन घेण्याची गरज नसते.) कमी कष्टाची कामे किंवा व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह प्रकाराची शक्‍यता वाढते. जे लोक दररोज 30 मी. सायकल चालवताता त्यांना मधुमेह प्रकार-2 होण्याची शक्‍यता 40 %ने कमी होतो.
हाडांचे विकार, संधिवात आणि सायकलिंग
सायकल चालवण्याने ताकद, समतोल व समन्वय (को ऑर्डिनेशन) हे शारिरीक आरोग्याचे गुण वाढतात. यामुळे खाली पडणे, हाडे मोडणे याची शक्‍यता कमी होते. सायकल चालवताना सांध्यावर ताण कमी पडतो त्यामुळे दुखापत कमी होते.
मानसिक आरोग्य- मन उदास होणे, ताण तणाव, चिडचिडे पणा येणे ही सर्व सायकलिंगने कमी होते.
इतर फायदे
प्रवासाचा खर्च कमी होतो.
इंधन बचत होते,
प्रदूषण होत नाही
पार्किंगचा प्रश्‍न नाही
ट्रॅफिकची समस्या कमी होते
नैसर्गिक पर्यावरणाचा तोल सांभाळला जातो.
Beautiful sporty young woman doing exercise in gym. Free Photo

काळजी काय घ्याल?

1)सायकलिंगने व्यायामही होते व मनोरंजनही परंतु काळजी घेणे अत्यावश्‍यक आहे. सायकल रस्त्यावर चालवत असाल तर हेल्मेट, नि पॅड, एल्बो पॅड वापरावे.

2)पाठीचा त्रास असणाऱ्यांनी जिम किंवा घरामध्ये “रेमकेंडेड बाईक’ चा वापर करावा. ज्यामुळे पाठीला आधार मिळतो.

3) सायकल निवडताना- सायलकमध्ये बरेच प्रकार आहे. व्यायामासाठी, खेळासाठी, प्रवासासाठी अथवा इतर काही गोष्टीसाठी यावरून सायकलची निवड करावी. सायकल कधीही ऑनलाईन विकत घेऊ नये.कारण तुमची गरज, उंची शरीराची ठेवण यावरून सायकलची निवड होते दुकानदाराशी चार्च करूनच सायकल खरेदी करावी.

4) जर बाहेर सायकल चालविणे शक्‍य नसेल घरातीरल सायकल घ्यावी किंवा जिममध्ये जाऊन स्पिंग बाईक, रेमकेंडड बाईक, स्टेशनरी बाईकचा वापर करावा. दोन्हीचे फायदे सारखेच आहेत. यामध्ये अजून एक प्रकार येतो. “विंड ट्रेनर’ ज्यामध्येतुम्ही तुमच्या सायकलला घरात स्टॅण्ड लावून काही काळ पुरता घरात एक जागी वापरू शकतो. ज्या स्टेशनरी बाईक म्हणतात. “मॅग्नेटिक ट्रेनरही तुम्ही वापरू शकता.

5) कडक व छोटी सीट असणाऱ्या सायकलचा वापर टाळा. जे स्त्रियांसाठी अवघडल्यासारखं वाटते. सिटची उंची अशी ठेवा ज्यामुळे गुडघा पूर्ण वाकणारही नाही किंवा पूर्ण पाय सरळही होणार नाही. पायात 25 अंशाचा कोन असूदेत. ज्यामुळे गुडघ्यावर ताण न पडता लॉकही होणार नाही.
सदर लेखामध्ये आपल्याला डॉ. जयदीप महाजनी (http://www.dainikprabhat.com) यांनी अगदी सोप्प्या भाषेत हे समजावले आहे की लहानपणापासून आपल्या सर्वांनाच आवडणाऱ्या ह्या सायकलचे किती फायदे आहेत. हे फायदे आपल्या सर्वांनाच माहित आहे त्यासाठी खूप अशा काही मोठ्या शिक्षणाचीही गरज नाही. पण एवढे असूनही आज आपल्यापैकी किती जण व्यायामाला महत्व देतात आणि किती वेळ स्वतःसाठी काढतो हे आपले आपणच तपासून पाहावे. Livewell: Lead Meaningful Life ह्या पुस्तकात लेखकांनी नेमके ह्याच गोष्टींवर सोप्या भाषेत भाष्य केले आहे आणि आपण कशाप्रकारे आपल्या रोजच्या जीवनातून वेळ काढून आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो हे समजावलेले आहे. तर हे पुस्तक वाचून आपण देखील आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल करू शकाल.  

खालील लिंकवर क्लिक करून हे पुस्तक घरपोच मिळवू 

शकता: 
[ संबंधित लेख  : https://bit.ly/2l0q6UD]

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या