योगसाधना करताना ह्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या

योगसाधना करताना ह्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या 

आजकालचे जीवनमान धावपळीचे आणि गुंतागुंतीचे आहे. या सगळ्याचा शारीरिक-मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
Group of people doing meditation on exercise mat Free Photo 
त्यातच आरोग्याची नीट काळजी न घेतल्याने शरीरात तणाव, थकवा, चिडचिडेपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी योगसाधना करणे हा एक उत्तम उपाय आहे.
पण योगसाधना करण्याचे काही नियम असतात. ते न पाळल्यास फायद्याऐवजी नुकसानच होईल. म्हणून जाणून घेऊया योगसंबंधित काही महत्त्वाचे नियम...
# योग करण्यापूर्वी वार्मअप करणे गरजेचे आहे. थेट आसने करण्यास सुरुवात करु नका. सुरुवातीला हलका व्यायाम केल्याने शरीर लवचिक बनेल.

# जेवल्यानंतर सुमारे ४ तासांनंतर योगसाधना करा. सकाळच्या वेळेस करणार असलात तर रिकाम्या पोटीही योगसाधना करु शकता.

# योग करताना तहान लागल्यास चुकूनही थंड पाणी पियू नका. त्यामुळे नुकसान होईल. कारण योगसाधना केल्यानंतर शरीर गरम होते आणि अशावेळी थंड पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला, अलर्जीसारख्या समस्या उद्भवतात.

# योगसाधना करण्याच्या सुरुवातीला हलक्या, सोप्या आसनांपासून सुरूवात करा. तुम्हाला योगासनांचा कितीही सराव असला तरी सुरुवातीला कठीण आसने करु नका. शरीर आसनांसाठी पूर्णपणे तयार झाल्याशिवाय आसने केल्यास त्रास होण्याची शक्यता असते.


Woman sitting in yoga pose on the beach Free Photo
# कोठेही पाहुन, वाचून आसने करु नका. कारण चुकीची आसने केल्यास नुकसान होऊ शकते. कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा मसल्स ताणणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच योगसाधना करणे योग्य ठरेल.

# योगसाधना केल्यानंतर लगेचच अंघोळ करु नका. कारण व्यायाम किंवा इतर शारीरिक क्रियांनंतर शरीर गरम होते. त्यामुळे व्यायामानंतर काही वेळाने अंघोळ करा.

# योगसाधना करताना मोबाईल जवळपास ठेऊ नका. कारण त्यामुळे लक्ष विचलित होते.


वर म्हटल्याप्रमाणे आजचे जीवनमान हे खूपच धावपळीचे झालेले आहे आणि त्यातच प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ह्या अशा स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी आपले शारीरिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे टिकवून ठेवणे हे केवळ आपल्याच हातात आहे. Livewell: Lead Meaningful Life  ह्या पुस्तकातून लेखकांनी खूपच साध्या आणि सोप्या इंग्रजी भाषेत हे पटवून दिले आहे की जर आपण मनात आणले तर आपल्या आरोग्याची काळजी आपण सहजपणे घेऊ शकतो. त्यासाठी व्यायामाबरोबर योग्य आहाराची जोड दिली तर एक चांगले आणि सुधृढ आयुष्य आपणही जगू शकतो हे ह्यात विविध उदाहरणांनी पटवून दिलेले आहे.


खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: 
[ संबंधित लेख  : https://bit.ly/2sITses ]

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या