या उपायांनी नियंत्रित राहील रक्तदाब!

या उपायांनी नियंत्रित राहील रक्तदाब!

जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार आज जगातील ७०% जनता ही चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारी पडत आहे आणि ह्यात सर्वात जास्त लोकं ही गरजेपेक्षा जास्त वजन, लठ्ठ किंवा अतिलठ्ठ प्रकारातली आहेत.
या उपायांनी नियंत्रित राहील रक्तदाब!

या उपायांनी नियंत्रित राहील रक्तदाब!

ह्यावरून आपण ह्याचे गांभीर्य सहज लक्षात घेऊ शकतो. त्यांच्याच अहवालानुसार प्रत्येक माणसाचे वजन हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असले पाहिजे आणि जर ते नसेल तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
असाच एक प्रकार आहे जो आज अनेक लोकांना भेडसावतोय आणि तो म्हणजे अनियंत्रित रक्तदाब.
आज ही समस्या संपूर्ण जागतिक स्तरावर एक गंभीर रूप धारण करून आहे. मग ह्यावर आपण आपल्या परीने कशी काय मत करू शकतो हे आपण आज येथे पाहुयात.

ब्लड प्रेशरची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. जेव्हा रक्तवाहिन्यातील प्रेशर 140/90 होते तेव्हा हायपरटेंशन होते. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका दुप्पट-तिप्पट वाढतो. वजन, हाय बीपी झाल्याने रक्त वाहिन्यांवर दबाव पडतो आणि त्या आकुंचित पावतात. त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. ब्लड प्रेशर हा मोठा आजार नसला तरी अनेक गंभीर आजारांचे मुळ आहे.
ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे
·         वजन वाढणे
·         व्यायाम न करणे
·         अंनुवंशिक
·         सातत्याने तणावात राहणे
·         धुम्रपान
·         थॉयराईड, ट्युमर सारखे आजार

किती असायला हवा बीपी?

नार्मल बीपी साधारण 120/80 पेक्षा कमी असायला हवे. यावरील स्टेजला प्री-हायपरटेंशन म्हणतात. बीपी 120 ते 139, 80 ते 89 च्या मधल्या स्थितीत असल्यास ब्रेन स्ट्रोक, हार्ट, किडनी आणि डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. 140/90 या स्थितीला हायपरटेंशन म्हणतात. जे सर्वात गंभीर आहे.

कधी तपासावा बीपी?

४० शीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ब्लड प्रेशर तपासणे गरजेचे आहे. नॉर्मल असले तरी दर ६ महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे. 
त्यावरील उपाय
·         रोज ४५ मिनिटे व्यायाम करा. 
·         चाला, जॉगिंग करा.
·         आहारातील मीठाचे प्रमाण कमी कराय
·         वजन नियंत्रित ठेवा.
·         स्वतःच्या छंदासाठी वेळ काढा. तुमच्या आवडीचे काम करा.
·         फळे आणि हाय फायबर असलेले पदार्थ अधिक खा.

·         फास्ट फूड, तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, गोड पदार्थ, पॅक्ड फूड खाणे टाळा. ]


सौजन्य : https://bit.ly/2HUkvJb

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या