मानव परमेश्वराचाच पुत्र:

मानव परमेश्वराचाच पुत्र:

ह्या जगात कोणत्याही माणसाला आपल्या इच्छेनुसार प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोणतीही गोष्ट मिळवता येणे सहज शक्य आहे, कारण परमेश्वर हा कोणत्याही माणसामध्ये कधीही भेदभाव करत नाही.

ह्या जगातील सर्व माणसांसाठी परमेश्वराने बहुतेक सर्वच गोष्टी योग्यरित्या उपभोगण्यासाठी  निर्माण केल्या आहेत. ह्यामध्ये जी गोष्ट आपल्याला जर मिळत नसेल तर तो दोष परमेश्वराचा नसून आपला आहे, ही जाणीव जेंव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला होईल तेंव्हाच खरा आपला उत्कर्ष होईल.
कारण एखादी गोष्ट न मिळणे म्हणजे आपण स्वतः आपल्याला वैचारिक बंधनात अडकून ठेवल्यामुळे आहे, जसे की ही गोष्ट माझ्यासाठी नाही, मला हे जमणार नाही, मी काय एवढा नशीबवान नाही, माझ्याकडे पुरेसे धन नाही, अशी एक ना अनेक करणे आहेत.

आज आपल्या आजूबाजूला असलेल्या शेकडो लोकांना हेच वाटते की आपण गरीबच राहणार, आपण श्रीमंत होऊ शकणार नाही, आपण काय एवढे नशीबवान नाही, पण प्रत्येकाने चांगले आयुष्य जगावे हीच परमेश्वराची इच्छा असते. आपल्या आजूबाजूला असलेली ही अपार निसर्गसंपत्ती ही प्रत्येक माणसासाठी आहे. असे असून देखील फारच थोड्या लोकांना त्याचा उपभोग घेता येतो. ज्यांना यश मिळत नाही त्याचे कारण अगदी साधे आणि सरळ आहे आणि ते म्हणजे आपल्या संकुचित विचारांमुळे माणसाला समृद्ध जीवन जगात येत नाही. ज्या माणसाच्या मनामध्ये संकुचित विचार आहेत तो अयशस्वी आणि समृद्ध जीवनापासून कायम दूर राहतो. कोणत्याही माणसाच्या चारित्र्याची निर्मिती सर्वप्रथम त्याच्या विचारातूनच होते. जो माणूस स्वतःच्या मनात भीती, संदेह बाळगतो त्याला कोणतेही यश मिळवण्यात अनंत अडचणी येतात. अशा विचारांमुळे अशा व्यक्तीला मदत मिळत नाही, हवी तशी परिस्थितीही निर्माण होत नाही आणि शेवटी त्याच्या पदरी अपयश येते.

आपल्या अंतर्मनाचा आपण योग्य असा विकास करावा हीच परमेश्वराची कायम इच्छा असते जेणेकरून ह्या भूतलावरील प्रत्येक गोष्ट तुम्हाला सुंदर दिसेल. तुमच्या मनातील क्रोध, द्वेष, सूड या भावना योग्य आणि चांगल्या विचारांनी आपोआपच नष्ट होतील. तुमची सतत प्रगतीच होत राहील. कोणतेही वाईट विचार आणि त्या अनुषंगाने केलेले काम नेहमीच तुमच्या डोळ्यांवर जणू पडदा टाकतात. वाईट विचारांच्या पडद्यामुळे परमेश्वराच्या असीम सामर्थ्याचे दर्शन तुम्हाला होणार नाही आणि तुम्ही परमेश्वरापासून दूर जाल. म्हणून कधीही आपल्या डोळ्यांवर आणि मनामध्ये वाईट विचारांचा पडदा येऊ देऊ नका हा पडदा जेंव्हा दूर होईल तेंव्हा तुम्हाला हवी असलेली गोष्ट आपोआपच स्पष्ट दिसू लागेल. तुम्ही ज्या गोष्टी शोधात फिरत होतात त्या स्वतःहून तुमच्याकडे येतील.human life is a gift of god साठी इमेज परिणाम

मानव परमेश्वराचाच पुत्र:

सौजन्य : https://bit.ly/2HOGuoO Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या