उन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा

उन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा


Kalingadache Fayde


उन्हाळा म्हटलं की बऱ्याच जणांना कधी संपतोय हा उन्हाळा असे वाटत राहते आणि मग ह्या उन्हाळ्यापासून स्वतःचे रक्षण करण्याकरता हर एक प्रकारे प्रयत्न प्रत्येकाकडून केले जातात.
उन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा

उन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा
त्यात मग त्वचेची काळजी घेणे, भरपूर पाणी पिणे अशा गोष्टींचा समावेश होतो. मग त्यासाठी काय केलं पाहिजे हे प्रत्येकजण आपापल्यापरीने करत राहतो आणि स्वतःची काळजी घेत राहतो. ह्याच उन्हाळ्याचा समर्थपणे सामना करण्यासाठी एक असे फळ आहे जे बहुतेकांना आवडते, तसेच खूपच गुणकारीही आहे आणि ते म्हणजे कलिंगड. जे ह्या दिवसात सर्व ठिकाणी अगदी सहज उपलब्ध असते आणि सामान्यांना परवडेल अशाही दरात असते.

सामान्यपणे कलिंगड भरपूर पाण्याचा अंश असल्यामुळे तहान भागवण्यासाठी उपयुक्त आहे हे जनरली लोकांना माहित असते पण ह्या कलिंगडाचे इतरही अनेक फायदे आहेत आणि ते आज आपण येथे जाणून घेऊयात.

१) कलिंगडामध्ये व्हिटॅमिन A, C, B6 आणि भरपूर प्रमाणात खनिजे असतात जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला भरपूर मदत करतात.

२) जे लोक वजन कमी करत आहेत त्यांनी उन्हाळ्यात नियमीत कलिंगडाचे सेवन केल्यास त्यांना त्याचा भरपूर लाभ होऊ शकतो.

३) लठ्ठपणा आणि वजन वाढीमुळे रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते, कलिंगडामुळे ते कमी होण्यास मदत मिळते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

४) कॅनसरचा धोका कमी होण्यास कलिंगडापासून मदत होते.

५) आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांचे झोपेचे तास कमी होत चालले आहेत आणि त्याचा थेट परिणाम अशा लोकांच्या विचारसरणीवर, कोणतीही गोष्ट नीट लक्षात ठेवण्यावर होत आहे. परंतु कलिंगडामुळे आपली बुद्धी तल्लख व्हायला खूपच मदत होते त्यामुळे आपल्या रोजच्या कामातला उत्साह वाढण्यास मदतच मिळते. 

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या