वजन वाढण्यामुळे या गोष्टींचाही करावा लागू शकतो सामना!

वजन वाढण्यामुळे या गोष्टींचाही करावा लागू शकतो सामना! 


आजकालची जीवनशैली ही खूपच धावपळीची झाली आहे. प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये इतका व्यस्त आहे की फारच थोड्या लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ द्यायला मिळतो.
वजन वाढण्यामुळे या गोष्टींचाही करावा लागू शकतो सामना!

वजन वाढण्यामुळे या गोष्टींचाही करावा लागू शकतो सामना! 

परंतु त्याचे प्रमाण फारच नगण्य आहे. आज जगातील अंदाजे ७०% लोकसंख्या चुकीच्या लाइफ स्टाइलमुळे वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त आहे आणि ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
त्यातच हल्लीच्या काळात वजन वाढीच्या समस्या अनेक लोकांना उद्भवत आहेत. त्यामुळे आपोआपच अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे


[ वजन वाढणे ही आजची  सर्वात मोठी समस्या आहे. वजन वाढल्याने केवळ अनेक आजारच होत नाही तर तुमच्या सुंदतेवरही वाईट प्रभाव पडतो. तसे तर वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत. पण लाईफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव इत्यादी कारणांनीही वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. वजन कमी करणं हे एक आव्हानच आहे. अनेकांना शॉर्टकटने वजन कमी करायचं असतं. त्यामुळे अनेकजण चुकीचे डाएट फॉलो करतात. अनेकजण उपाशी राहून शरीराला नुकसान पोहोचवतात. चला जाणून घेऊया वाढलेल्या वजनामुळे कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. 
1) तणाव
इंटरनेशनल जर्नल ऑफ ऑबेसिटीमध्ये  प्रकाशित एका संशोधनानुसार, जाडपणा मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. जाडपणामुळे तुम्हाला तणावाचा आणि डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो. 
2) स्लीप एपनिया
जेव्हा तुम्ही वाकता तेव्हा छातीत, मानेत आणि चेहऱ्यावरील जास्तीच्या मांसामुळे तुमची श्वासनलिका दबली जातेय त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. झोपताना शरीरात योग्य प्रमाणात हवा न पोहचल्याने तुम्हाला अस्वस्थ होतं. त्यामुळे तुमची झोप उडू शकते. 
3) डायबिटीज 
मध्यम जाडेपणामुळेही टाईप 2 चा डायबिटीज होण्याचा धोका असतो. 
4) कोलेस्ट्रॉल
तुमच्या शरीरात असलेल्या अतिरीक्त फॅटमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे तुम्हाला हृदयरोग आणि स्ट्रोक सारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
5) त्वचा रोग
जाडेपणामुळे तुमच्यातील हार्सोन्सचं संतुलन बिघडू शकतं. यामुळे तुमची त्वचा प्रभावित होऊ शकते. याचकारणाने त्वचेवर काळे निशाण तयार होतात. ]

सौजन्य :  https://bit.ly/2Ic4RfJ  

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या