विचारांची श्रीमंती बाळगा

विचारांची श्रीमंती बाळगा

ह्या जगात ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या किंवा सध्या आहेत आणि त्यांनी जे कार्य केले आहे, तसे कार्य तुम्हीही करू शकता कारण आपल्या प्रत्येकाकडे ते सामर्थ्य आहे.
विचारांची श्रीमंती बाळगा

विचारांची श्रीमंती बाळगा

एक गोष्ट येथे कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत कारण तुम्ही मनात वाईट विचारांना थारा देत असता.
म्हणूनच वाईट विचारांना कायम आपल्यापासून दूर लावण्याची गरज आहे. हे काम स्वयं आपल्यालाच करावे लागेल कारण दुसरा ते आपल्यासाठी करू शकत नाही आणि ते सहज शक्य आहे, कारण मुळातच वाईट विचारांचा आपल्याशी तसा संबंध नाही.
परिस्थिती ते करायला लावते कारण आपला आपल्या मनावर ताबा नसतो. वाईट विचार बाळगणे हे नैसर्गिक नाही, तरीही अनेक माणसे त्या विचारांना बळी पडतात आणि त्यामुळे त्यांना आपले नैसर्गिक सामर्थ्य प्रगट करता येत नाही.

जर तुम्हाला उच्च यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या मनातील विचारांना आणि भावनांना योग्य वळण लावले पाहिजे. सुख आणि समृद्धी यांचा जन्म सर्वप्रथम आपल्या मनामध्ये होत असतो आणि त्यानंतरच ते आपल्या कृतीतून आपल्याला बाह्यरूपात प्राप्त होत असते. मनामध्ये वाईट विचार असताना कोणत्याही माणसासाठी भरभराट होणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच मनामध्ये कायम समृद्धीचेच विचार बाळगा. सर्वप्रथम आपण विचारांची श्रीमंती मिळवली पाहिजे जी प्रत्येकाची प्रत्येकाच्या हातात आहे आणि ती सततच्या प्रयत्नाने मिळवणे सहज शक्य आहे. जो माणूस स्वतःला भाग्यहीन मानतो अशा माणसाच्या मनामध्ये उत्साह नसतो, त्याला यशाचा वाराही लागत नाही आणि ज्याला यश लाभत नाही तो माणूस कायमच स्वतःला कमजोर व दुबळा समजत असतो. ही भावना तुम्ही जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत समृद्धी तुमच्यापासून दूर राहील. मला अपयश येईल कि काय? असा जर मनात विचार येत असेल तर तुम्ही खरोखरच अयशस्वी व्हाल. जर भरभराटीचा विचार कराल तर तुमची कायम भरभराटच हुईल ह्यात तिळमात्रही शंका नाही.

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या