आपले मन कायम निर्मळ ठेवा:

आपले मन कायम निर्मळ ठेवा:

ह्या संपूर्ण विश्वामध्ये मैत्री आणि प्रेमभावनेचे रहस्य खूप साधे आहे हे आपण सर्वप्रथम जाणले पाहिजे. ह्यामधूनच आपली कोणतेही कार्य करण्याची शक्ती आणि लायकी आपोआपच वाढेल.
आपले मन कायम निर्मळ ठेवा:

आपले मन कायम निर्मळ ठेवा:

 कारण ह्या जगात प्रत्येक मनुष्याकडे कोणते ना कोणते दैवी सामर्थ्य दडलेले आहे आणि जेंव्हा आपले परमेश्वरी सामर्थ्याशी नाते जोडले गेले की आपल्याला ह्या विश्वात काहीच कमी पडणार नाही.
तुमच्या आतील परमेश्वरी अंशाचा ज्या दिवशी तुम्हाला ठाव लागेल त्याच क्षणी तुमच्या मनावरचे मळभ व धूळ लागलीच दूर होऊन जाईल आणि तुमचे मन नितांत निर्मळ होऊन जाईल.
ज्याचे मन पवित्र आणि निर्मळ असते तोच ह्या जगात श्रेष्ठ व्यक्ती बनू शकतो हे कायम लक्षात ठेवा. मग आता हा प्रश्न उपस्थित होतो की " ह्या जगात अनेक लोक का दरिद्री रहातात?". तर ह्याचे कारण एकदम सरळ आहे, हे असे लोक कायम आपल्या मनात वाईट विचार, सूड, मत्सर यांना प्रवेश देत असतात. ह्या अशा वाईट गोष्टींमुळे अशा लोकांना ईश्वरी सामर्थ्य लाभत नाही आणि ते कायम अडून राहते. म्हणूनच मनामध्ये दुष्ट आणि स्वार्थी विचारांना कदापि थारा देऊ नका. परिस्थिती कशीही असो जेवढे मन निर्मळ ठेवाल तेवढे तुम्हाला या विश्वाचा सर्वश्रेष्ठ स्वामी असलेल्या परमेश्वराचे सानिध्य लाभेल.

तुम्ही एकदा का त्या परमेश्वराच्या जवळ पोहोचलात की, ह्या जगामधील प्रत्येक सुंदर गोष्टच तुम्हाला दिसेल. तुमच्या मनामधील क्रोध, द्वेष, सूड, या भावना आपोआप नष्ट होतील आणि तुमची तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्यात कायमच प्रगती होईल. एक लक्षात ठेवले पाहिजे की वाईट विचार आणि वाईट काम कायमच आपल्या डोळ्यावर जणू पडदा टाकतात ह्या अशा पडद्यामुळे आपल्याला आपल्या आतील परमेश्वरी सामर्थ्याचे दर्शन होत नाही आणि ते सामर्थ्य आपल्यापासून दूर जाते व आपल्या रोजच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाताना आपल्याला दुर्बल बनवते. म्हणूनच आपल्या डोळ्यांवर कायम चांगल्या विचारांचा पडदा असू द्या, कारण वाईट विचारांचा पडदा दूर झाला की तुम्हाला जे काही आयुष्यात साध्य करायचे आहे ती वस्तू स्पष्ट दिसू लागेल. तुम्ही ज्या गोष्टींच्या शोधात आहात त्या गोष्टी व वस्तू तुम्हाला शोधात तुमच्याकडे येतील. म्हणून मनामध्ये कायम चांगलेच विचार येऊ द्या.

स्वामी विवेकानंदांनी म्हटलेच आहे "आपल्याला आपल्या विचारांनीच घडवले आहे".


Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या