डिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय?

डिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय?

Depression Mhanje kay? 

डिप्रेशनची अशी काही नीट व्याख्या करता येत नाही, पण मनाची उदासीन अवस्था म्हणजे डिप्रेशन, अशी याची ढोबळमानाने व्याख्या करता येईल.
डिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय?

डिप्रेशन (नैराश्‍य) म्हणजे नेमकं काय?

कोणतंही काम करावंसं न वाटणं, दु:खी असणं, सतत काळजी, चिडचिड करणं, स्वत:ला दोषी समजणं, दैनंदिन कामात अजिबात रस नसणं, थोडक्‍यात काहीही करावंसं न वाटणं किंवा मूड नसणं म्हणजे डिप्रेशन येणं होय.
दिवसेंदिवस वाढणा-या स्पर्धेमुळे हे डिप्रेशन माणसाच्या आयुष्यात डोकावू लागलं आहे.

वाढत्या गरजांमुळे किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहानसहान वाटणाऱ्या गोष्टींमुळे कित्येक जण काही ना काही कारणाने असे नैराश्‍याच्या गर्तेत इतके अडकतात की, त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. त्यातून काही जण लवकर बाहेर पडतात, तर काही जण त्याच गोष्टीत गुरफटून राहतात.
जागतिक आरोग्य संस्थे(डब्ल्यूएचओ)च्या म्हणण्यानुसार, एचआयव्ही, अन्य संसर्गजन्य आजार तसंच हृदयरोगानंतर निर्माण होणारे आजार नैराश्‍येला कारणीभूत ठरतात आणि हे मानसिक दुर्बलता जगभरात वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं समोर आलं आहे. नव्याने केलेल्या अभ्यासानुसार, नैराश्य आल्यास किमान दोन आठवडे टिकतं आणि त्यामुळे झोप उडणं, भूक न लागणं, कामातील रस कमी होणं, कंटाळा येणं तसंच मृत्यूचे विचार वारंवार घोळणं, विचारांमध्ये सुसंगती न राहणं असे परिणाम दिसून येतात. या लक्षणांमुळे त्यांच्या नोकरीविषयक, शैक्षणिक, सामाजिक आणि अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील कामात अडचणी निर्माण होतात.
भारतात नैराश्‍याकडे कायम दुर्लक्षच केलं जातं. अनेक निराश रुग्ण विशेषत: समाजातील निम्न सामाजिक-आर्थिक स्तरातील लोक आपल्या फॅमिली डॉक्‍टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे कधीही मानसशास्त्रज्ञांकडे जाण्याचं नाव काढत नाहीत किंवा लक्षणं कधीही दर्शवत नाहीत. अशा रुग्णांना साधारणपणे जीवनसत्त्व, टॉनिक किंवा अन्य औषधं दिली जातात. यापैकी बरेच रुग्ण शारीरिक तसंच मानसिक लक्षणं दर्शवतात. नैराश्यावर मात करणारी औषधं त्यांना दिली जातात तेव्हा त्यांचा डोस कमी असतो.
वर्षभरात नैराश्‍याशी निगडित आजारांमध्ये सहा ते 10 टक्के वाढ दिसून आली आहे. हे प्रमाण सर्वच गटात दिसून येत असलं तरी प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त आढळून येतं. परिणामकारक उपचार उपलब्ध असूनही अँटिडिप्रेसंट औषधांचा तसंच काही प्रकारच्या सायकोथेरपीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. हे परिणामकारक उपचार उपलब्ध असले तरी पाच ते 10 टक्के नैराश्‍य आलेल्या रुग्णांना मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डरपासून सुटका मिळत नाही. अशा रुग्णांना ट्रीटमेंट-रेसिस्टंट डिप्रेशनचा त्रास सहन करावा लागतो. या रुग्णांकरता आता डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) ही नवीन उपचारपद्धती अस्तित्वात आली आहे]
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच प्रत्येक क्षेत्रात वाढलेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे बरेच लोक डिप्रेशन मध्ये जीवन जगत  आहेत. पण जर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित असेल तर बऱ्याच अंशी आपण रोजच्या आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना व्यवस्थित सामोरे जाऊ शकतो हे संशोधनाने सिद्ध झालेले आहे. मग रोजच्या कामातून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढणं हे क्रमप्राप्त ठरतेतर ते आपण कशा प्रकारे करू शकतो हे Livewell – Lead Meaningful Life ह्या संकेत आणि मेघना प्रसादे ह्याच्या प्रेरणादायी पुस्तकातून खूपं छान आणि सोप्या भाषेत समजावले आहे. जर आपले वैयक्तिक आयुष्य जर अर्थपूर्ण असेल तरच आपण एक समृद्ध जीवन जगू शकतो आणि ह्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आपल्या निरोगी आयुष्याचा आहे. तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच एक शारीरिक आणि मानसिकरीत्या अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करेल.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मिळवू 
शकता: 

सौजन्य (लेख) : https://bit.ly/2JWJT1J

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 
आमच्या खालील ब्लॉगला अवश्य भेट द्या:आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या