योग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा

योग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा:  

Yogya vicharatun vaibhavsampanna vha: ह्या जगातील प्रत्येक व्यक्ती वैभव संपन्न होऊ शकते.
योग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा

योग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा 

ह्या जगामध्ये आपण प्रत्येकानेच आपली महत्वाकांक्षा पूर्ण करावी, आणि ह्या समस्त मानवजातीच्या सुखांमध्ये थोडीफार भर घालावी हीच परमेश्वराची इच्छा आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंगात अनेक गुण दडलेले आहेत. ते जर आपण योग्य रित्या वापरले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ.
मी जेथे राहतो त्या ठिकाणी एक रस्त्यावर सॅंडविच विकणारा आहे, त्या छोट्याश्या धंद्यातून त्याने तब्बल तीन माजली घर बांधले, आता तुम्ही म्हणाल त्याचे नशीब चांगले असेल आणि म्हणूनच हे शक्य झाले. पण नशीब हा भाग आपण बाजूला ठेवला तर त्याच्या मनामध्ये कायमच वैभवसंपन्न होण्याचे विचार होते म्हणून हे शक्य झाले आणि ह्या विचारानेच तो रोज फूटपाथवर सॅन्डविचची गाडी लावायचा. पण येथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा योग्य विचारांनी अशा प्रकारचे वैभव मिळवू शकता. पॅरामेश्वराचीसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा असते.

आपल्या योग्य विचारांनी कठीण परिस्थितीतून वैभवसंपन्न झालेली अनेक उदाहरणे ह्या जगात आहेत. आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहतो की या जगात श्रीमंत झालेले फार कमी लोक आहेत. ह्याचे कारणसुद्धा ते करत असलेल्या विचारांमध्येच आहे. भारत काय किंवा जगातले इतर देश काय तुम्हाला प्रत्येक देशात अनेक माणसे अब्जाधीश झालेली पाहायला मिळतील. युरोप खंडामध्ये अनेक राष्ट्रांनी एक नाही तर दोन महायुद्धाचा सामना केला आणि त्यामध्ये अनेक राष्ट्रे बेचिराख झाली पण आज तुम्ही पाहाल तर हेच देश किती सुंदर आणि स्वच्छ आहेत. जपानसारख्या देशावर तर महायुद्धात कोणावरही अशी वेळ येऊ नये असे झाले, अणुबॉम्बमुळे हे संपूर्ण राष्ट्रच उध्वस्त झाले पण आज जपान बद्दल मला वेगळे सांगायला नको की ह्या राष्ट्राची गेल्या ५० वर्षातली प्रगती काय आहे. एक उदाहरण येथे द्यावेसे वाटते आणि ते म्हणजे संपूर्ण जपानमध्ये कुठेच पर्याप्त लोखंड/खनिज नाही पण हाच जपान आज अमेरिकेसह संपूर्ण जगात रेकॉर्डतोड वाहनांची आणि मोठमोठ्या महाकाय जहाजांची निर्मिती करून ते निर्यात करतो. आता हे कसे काय शक्य झाले ? कारण जपानी लोकांनी कायमच श्रमदेवतेची उपासना केली. वैभवसंपन्न होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काया - वाचा - मनाने चित्त एकाग्र करून श्रमाची कास धरल्यास ह्या जगात कोणताही व्यक्ती वैभव मिळवू शकतो. Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 

Fill the following link for the inquiry: 
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या