गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?

गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?

असे नेहमीच म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आनंदाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो.
गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?

गॅस आणि अॅसिडीटीपासून कशी मिळवाल सुटका?

पण ह्याच आनंदावर विरझण घालण्याचे काम आपल्या हल्लीच्या चुकीच्या आणि वेळीअवेळी खाण्याच्या सवयीमुळे तयार होणारा गॅस करतो. म्हणूनच हल्ली अनेकांना गॅसच्या समस्येने ग्रासलेले दिसून येते. बरेच लोकं गॅस ही किरकोळ गोष्ट आहे असे मानतात.
मात्र, ती दिसते तितकी सर्वसामान्य नाही. म्हणूनच गॅसपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात पळाल्या तर ह्यावर नक्कीच आपण मत करू शकतो.

१) कार्बनयुक्त ड्रिक आणि वाईन अशा पेयांचे वारंवार सेवन आपल्या पोटात कार्बन डायऑक्साईड निर्माण करते ज्याने आपल्याला गॅसचा त्रास होऊ शकतो.

२) ज्या प्रकारचे आपले काम आहे, जसे की आपण बैठे काम करत असाल, दिवसभर उभे राहून करता त्याप्रमाणे आहार घ्या. तसेच कधीही भूकेपेक्षा जास्त आणि मसालेदार जेवण टाळा.

३) परिस्थिती कशीही असो तुम्ही नेहमीच तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. कारण तणावाचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जीवनशैलीवर होतो आणि परिणामी आपल्या खाण्यावरही होतो. त्यामुळे तणावाला थोडासा दूरच ठेवा.

४) आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याचदा लोकं उशिरा जेवतात अथवा जास्त वेळ उपाशी राहून काम पूर्ण कसे होईल ते बघत असतात पण जास्त वेळ उपाशी राहिल्याने किंवा उशिरा जेवल्याने पोटात गॅस होतो. एक साधा नियम कायम लक्षात ठेवा की तुम्ही भोजनास जितका वेळ लावाल आणि तुमचे पोट रिकामे ठेवाल तितका वेळ तुमच्या पोटात गॅस निर्माण होईल.

५) बऱ्याच लोकांना जेवल्यावर लगेच झोपायची सवय असते म्हणून जेवल्यानंतर लगेच झोपू नका. काही वेळ एका जागी बसून मग थोडा वेळ चालत रहा. त्यामुळे पचनक्रियेला चालना मिळते. तसेच, असे केल्याने पोटही फुगत नाही.

वर सांगितलेले हे उपाय अत्यंत साधे व घरी करता येण्यासारखे आहेत. म्हणूनच जर आपण जाणीवपूर्वक हे उपाय केल्यास आपल्याला गॅसपासून मुक्तता मिळण्यास चांगलीच मदत होऊ शकते.
Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या