निराशेचे विचार कायम दूर ठेवा

निराशेचे विचार कायम दूर ठेवा  असं नेहमीच म्हटले जाते की जगातील प्रत्येक व्यक्ती ही एक ईश्वरी अंश आहे, आपल्या प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे. आपला आत्मा हे एक परमात्म्याचेच एक रूप आहे असे फार पूर्वीपासून सांगण्यात आलेले आहे.

निराशेचे विचार कायम दूर ठेवा

निराशेचे विचार कायम दूर ठेवा  


परमेश्वराने आपल्याला एक सामर्थ्यशाली व्यक्ती बनवूनच ह्या भूतलावर पाठवले आहे.
म्हणूनच परिस्थिती काहीही असो पण मी ह्या परिस्थितीचा सामना करण्यास समर्थ आहे, यावर आपला अढळ विश्वास हवा आणि ह्या विश्वासातूनच आपल्याला जीवनात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगांना तोंड देण्यासाठी शक्ती आणि स्फुर्ती मिळेल.

ह्यामुळे एक गोष्ट नक्की तुमच्या मनावर बिंबबवली जाईल आणि ती म्हणजे आपण सर्व शक्तिमान आहोत आणि कोणतेही कार्य करण्यास समर्थ आहोत. आपल्याला जे काही आपल्या आयुष्यात साध्य करायचे आहे त्याबद्दलचा विचार कायम आपल्या मनात जागृत असायला हवा. आपल्या ध्येयाशिवाय कोणतेही विचार मनात आले तर त्यांना त्वरित दूर करा. नेहमीच स्वतःशी स्वतःच्या ध्येयाबद्दलच बोला म्हणजे आपोआपच तुमच्या तोंडून सकारत्मक उद्गारच येतील आणि तुम्ही तशाच गोष्टी कराल ज्या ध्येयासाठी उपयुक्त आहेत. अन्य कोणतेही विचार तुमच्या मनात येणार नाहीत  आणि तुम्ही सहजपणे आपली कामे करत जाल ह्यात तिळमात्र शंका नाही.    

पण काही लोकांना कायम तक्रार करण्याची सवय असते आणि असे लोक खूपच निराशावादी असतात, आपल्या विषयी त्यांना प्रेम नसते आणि म्हणूनच ते सतत स्वतःच्या कमनशीबाबद्दल कायम रडगाणे गात राहतात. अयशस्वी होण्याची भीती कायम त्यांच्या मनात असते आणि त्याबद्दल ते नेहमीच बाह्य गोष्टींना दोष देत राहतात किंवा त्यांच्या भाग्याला दोष देतात. निराशेचे विचार कायम मनात असल्याने त्यांना दु:खाचे प्रसंग अधिक भोगावे लागतात. आपल्या विचारांमुळेच आपल्याला नैराश्य येत आहे हे त्यांना समजत नाही. म्हणूंनच जर आपल्याला यशस्वी आयुष्य जगायचे असेल तर सर्वप्रथम निराशेचे विचार मनातून काढून टाकले पाहिजेत आणि सतत चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. सतत नशिबाला दोष देणे तर सर्वात पहिल्यांदा बंद केले पाहिजे. नेहमी पवित्र विचार मनात आणले पाहिजेत, किंवा चांगले छंद जोपासले पाहिजेत जेणेकरून आपण सदैव बिझी राहू, कारण उत्तम विचारातूनच आपल्याला सुख समाधान शांतता मिळणार आहे हे कधीही विसरू नका. चला तर मग आज आणि आतापासूनच आपण जाणीवपूर्वक निराशेचे विचार दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तरच आपण एक उज्वल भविष्य घडवू शकतो.Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या